AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! देवेंद्रजी अवश्य यावे…स्वागतास उत्सुक… संजय राऊतांचे थेट देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण, नागपूरमध्ये घडतंय काय?

Sanjay Raut on Devendra Fadnavis: संजय राऊतांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहिले आहे. राऊत सध्या नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. 18 जुलै रोजी रामरक्षा आंदोलनाची तयारी सुरू आहे. त्यातच त्यांनी फडणवीस यांना निमंत्रण धाडले आहे.

मोठी बातमी! देवेंद्रजी अवश्य यावे...स्वागतास उत्सुक... संजय राऊतांचे थेट देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण, नागपूरमध्ये घडतंय काय?
संजय राऊत, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस
| Updated on: Jul 16, 2026 | 11:37 AM
Share

Sanjay Raut on Devendra Fadnavis: राज्याच्या राजकारणात बड्या घडामोडी घडत आहेत. त्यातच उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी फडणवीस यांना रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचे आमंत्रण धाडले आहे. राऊत सध्या नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. 18 जुलै रोजी, शनिवारी राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात ठाकरे सेना रामरक्षा आंदोलन करणार आहे. या आंदोलनात राम रक्षा म्हणण्यावरून अगोदरच फडणवीस-उद्धव ठाकरे यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. त्यानंतर आता राऊतांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आमंत्रण फडणवीसांना धाडले आहे. थोड्याचवेळापूर्वी त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचे घर हे या कार्यक्रमस्थळापासून अगदी जवळ आहे. ते कट्टर रामभक्त आहेत. ते अयोध्येत कार सेवक म्हणून गेले होते. त्यांनी रामभक्त म्हणून या आंदोलनात सहभागी व्हावे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

त्या पत्रात काय?

देवेंद्र फडणवीसजी, जय महाराष्ट्र! अशी सुरूवात करत खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहेत. “आपण एक प्रखर रामभक्त आणि कढाट हिंदुत्ववादी आहात. अयोध्येतील राम जन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनात आपण सहभागी झाल्याचे आपण नेहमी सांगता, आपल्यासारख्या लाखो राम भक्तांच्या संघर्षातून राम जन्मभूमी मुक्त झाली व अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहिले. याच राम मंदिरात चोरी, लुटमार, फसवणूक असे गुन्हे घडत आहेत व शेकडो कोटींचा अपहार झाला. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अयोध्येतील चोरीबाबत ‘शोक’ व्यक्त केला. शिवसेना उद्या बाळासाहेब ठाकरे पक्षाने या राम मंदिर लुटीबाबत लोकांत जागूती आणण्यासाठी ‘रामरक्षा उपक्रम सुरू केला. रामरक्षा म्हणजे रामाची सुरक्षा हे समजून घ्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे. सदर कार्यक्रम नारपुरात होत असल्याने आपण या ‘रामरक्षा’ उपक्रमात आवर्जुन सहभागी होऊन राम भक्तांना शुभेच्छा द्याव्यात, ही आग्रहाची विनंती.” असे पत्र राऊतांनी त्यांना पाठवले आहे.

शनिवारी रामरक्षा आंदोलन

मुंबईनंतर आता उद्धव सेनेकडून राज्यभर रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे. येत्या शनिवारी, 18 जून रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये सायंकाळी 4:20 वाजता राम मंदिर, रामनगर येथे राम रक्षा उपक्रमातंर्गत आंदोलन करण्यात येणार आहे. रामरक्षा वाचनासह राम मंदिरातील दानचोरीविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात फडणवीस आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोविंद गिरी महाराज कायद्यापेक्षा मोठे आहेत का?

गोविंद गिरी महाराज कायद्यापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल राऊतांनी विचारला. तुम्ही ज्यांचं नाव घेत आहे ते राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहे. ते असताना राम मंदिरात ची तिजोरी लुटण्यात आली. अशात त्यांची जबाबदारी निर्माण होत नाही का? सर्वाधिक जबाबदारी कोषाध्यक्षाचीच असते. ते कोषाध्यक्ष असताना कोट्यवधींची लूट झाली आहे. एसआयटीच्या रिपोर्ट मध्येही तसं आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशीही झाली पाहिजे. हे म्हणतात पुण्यातून ऑडिटर पाठवत होते. हे पुण्यातून ऑडिटर पाठवण्यासारखं काम आहे का? एवढा मोठा मंदिर आहे, तो हिंदूंची अस्मिता आहे, त्यासाठी लोकांनी बलिदान दिले आहे, आणि हे पुण्यातून ऑडिटर पाठवत होते. मंत्रीपदासारखा त्या खुर्चीला (कोषाध्यक्ष पद) काय चिटकून बसत आहात, हे आम्हाला कळत नाही. आम्ही त्यांचा राजीनामा मागत नाही, तरी ते स्वतः राजीनामा बद्दल बोलत आहे. ते राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष असल्याने सर्वाधिक जबाबदारी त्यांची आहे, असे राऊत म्हणाले.

डीमिलिटेशन विधेयकावर शिवसेनेची भूमिका काय?

सर्व राज्यात 50% जागा वाढल्या, आणि सरकार त्या संदर्भातली भूमिका घेऊन संशोधन संदर्भात प्रस्ताव आणला, तर त्याबद्दल चर्चा होऊ शकते यासंदर्भात इंडिया ब्लॉकच्या कुठलाही पक्ष एकटेपणाने निर्णय घेणार नाही.. शिवसेना तसा निर्णय घेणार नाही, राष्ट्रवादी तसं निर्णय घेणार नाही, आणि काँग्रेसही तसा निर्णय घेणार नाही. आम्ही सर्व मिळून निर्णय घेऊ, असे राऊत म्हणाले.

तुम्ही वारंवार प्रश्न विचारत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना डेलीमीटेशन विधेयकाला समर्थन करेल, असा कुठलाही निर्णय झालेला नाही.. सुप्रिया सुळे यांनीही स्पष्ट केले आहे जर काही सुधारित प्रस्ताव आला, तर इंडिया ब्लॉकचे सर्व पक्ष एकत्रित बसतील आणि त्याबाबत सामुदायिक निर्णय होईल.. कोणताही पक्ष एकटा निर्णय घेणार नाही, जर कुठल्या पक्षाने एकटेपणाने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, तर इंडिया ब्लॉक मध्ये त्याबद्दलही चर्चा होईल. सामुदायिक आणि एकत्रित निर्णय घेतला जाईल आणि कृती केली जाईल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हातात

ज्या पद्धतीने राम मंदिरात चोरी आणि लूटमार झाली आहे. हजारो आणि शेकडो कोटींची चोरी झाली आहे, ही गोष्ट विश्वास आणि श्रद्धेला तडा देणारी आहे. हा धक्का फडणवीस यांना सुद्धा बसला असेल. त्यांना जर खरोखरीच तसा धक्का बसला असेल तर त्यात त्यांनी सहभागी व्हावे अशी आमची अपेक्षा असल्याचे राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या नियंत्रणाखाली संपूर्ण राम मंदिराचा कारभार चालतो, असे राऊत म्हणाले. राम मंदिराचा कारभार चालवता येत नसेल तर राम मंदिराच्या चाव्या आमच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटनांच्या हाती द्याव्यात अशी मोठी मागणीही राऊतांनी केली. तर त्याचवेळी राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हातात असल्याचा आरोपही राऊतांनी  केला.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक