Devendra Fadnavis : मुख्यमंत्री नुसते बोलले नाहीत करुन दाखवलं, देवेंद्र फडणवीस आज रात्री दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामी, उद्या त्यांच्यासोबच साजरी करणार दिवाळी

cm devendra fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करणार आहे. त्यानंतर उद्या त्यांच्यासोबच दिवाळी साजरी करणार आहेत.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री नुसते बोलले नाहीत करुन दाखवलं, देवेंद्र फडणवीस आज रात्री दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी  मुक्कामी, उद्या त्यांच्यासोबच साजरी करणार दिवाळी
cm fadnavis news diwali
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 12:08 PM

राज्यात यंदा शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बळीराजा संकटात सापडला आहे. याच शेतकऱ्याला सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिली आहे.  संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा धावून आले आहेत. दिवाळी निमित्ताने प्रत्येक मंत्र्‍याने किमान एक दिवस एखाद्या गावात जाऊन शेतकऱ्यांसबोत सण साजरा करावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी साजरी करणार आहेत.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामी  करणार आहेत. मुख्यमंत्री आज नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारीसावंगा गावात रात्री मुक्कामी राहून शेतकाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहे.  यासाठी नागपूरच्या लोहारीसावंगा गावात तयारी सुरू झाली आहे. दुष्काळाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या घरी मुख्यमंत्री दिवाळी साजरी करणार आहेत. गावात मुक्काम करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. दुष्काळी पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यासोबत दिवाळी साजरी करणार आहे.

Loading...

फडणवीस काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केलं होतं की, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकारला पूर्ण सहानुभूती आहे.  दिवाळीनिमित्त प्रत्येक मंत्र्यानं किमान एक दिवस एखाद्या गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत सण साजरा करावा’.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले होते की, शेतकरी सध्या दुष्काळी परिस्थिती आणि विविध नैसर्गिक संकटांना तोंड देत आहे. दिवाळीच्या आनंदात हा शेतकरी कुटुंबाचा सहभाग असला पाहिजे. या संकटकाळातही शासन हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. तर मुख्यमंत्र्‍यांनी याच भावनेतून दिवाळी थेट शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी या उपक्रमाची घोषणा केली होती. मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून अडचणी समजून घ्याव्यात, असे फडणवीसांनी स्पष्ट केले होते. शेतकऱ्यांसाठी सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांनीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे,  असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us