मिलिंद नार्वेकर शिवसेनेत येणार का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हसले आणि म्हणाले…

| Updated on: Apr 22, 2024 | 6:41 PM

मविआ सरकारचा आवडता विषय होता लाॉकडाऊन लॉकडाऊनअमेरिकेत आणि जपानमध्ये लॉकडाऊन लागला की इकडेही लॉकडाऊन. आपलं सरकार आलं कि आपण सर्व गोष्टी शिथील केल्या. सर्व सण उत्सव धुमधुडाक्यात साजरे केले. फेसबुक लाईव्ह नाही फेस टू फेस काम करायला लागलो. मी उंटावरून शेळ्या कधी हाकल्या नाही. मी डॉक्टर नसताना पट्टा काढून दाखवला. आता ते शेताच्या बांधावर फिरायला लागलेले आहेत, असा हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

मिलिंद नार्वेकर शिवसेनेत येणार का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हसले आणि म्हणाले...
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेत येणार असल्याच्या गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. मिलिंद नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शिंदे गटाची ऑफर असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे शिवसेना सोडणार का? अशी चर्चा रंगलेली आहे. याबाबत आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनच प्रतिक्रिया आली आहे. मुख्यमंत्र्यांना जेव्हा नार्वेकरांविषयी विचारलं तेव्हा ते हसले आणि नार्वेकर अजून आमच्या संपर्कात नाही, असं सांगून निघून गेले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या मुलाखतीत मी जे बोललो ते खरं आहे. आणखी बरंचसं खरं आहे. ते नंतर येईल. ब्रेक के बाद. खूप काही आहे. एखादा कार्यकर्ता एवढा मोठा निर्णय घेतो, त्याला काही कारणं असतात. जे आहे ते आहे. मी कधी खोटं बोललो नाही. बोलणार नाही. माझे काही इथिक्स आहेत. बाळासाहेबांच्या विचारांची प्रेरणा आणि दिघे साहेबांच्या शिकवणीत मी तयार झालो आहे. जिथे अन्याय तिथे न्यायासाठी झगडणं हा माझा स्वभाव आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

जनताच उत्तर देईल

राजकारणाचा स्तर खालावलाय का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना कामधंदा नाही. कामं आम्ही करतोय. आरोप ते करत आहेत. आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, परंपरा आहे. सध्या आरोप केले जात आहेत. टीका होत आहे. महिलांवर कधीच टीका झाली नव्हती. असं कधीच झालं नव्हतं. आता ते होत आहे. या सर्व गोष्टींना जनताच मतपेटीतून उत्तर देईल, असंही त्यांनी सांगितलं.

मोदीच पंतप्रधान होणार

मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. जनतेने ठरवलंय अब की बार 400 पार. देशात कोण आहे त्यांच्यासमोर? राहुल गांधी गरम झालं की परदेशात थंड हवा खायला जातात, इथे उन्हाळा, पावसाळा, दिवस रात्र या देशाची सेवा करणारा पंतप्रधान मोदींच्या रुपाने मिळाला. देशाची बदनामी करणाऱ्याला की देशाची उन्नती करणाऱ्याला लोक निवडून देणार? असा सवालही त्यांनी केला.