AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वांना माहीत आहे साहेब कसे नेते आहेत; नातवाचा शरद पवार यांच्यावर थेट निशाणा

बारामती लोकसभा निवडणुकीत कुटुंबातच संघर्ष पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना बारामतीत पाहायला मिळत आहे. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कुटुंबातील लोक रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे आता कुटुंबातच आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे.

सर्वांना माहीत आहे साहेब कसे नेते आहेत; नातवाचा शरद पवार यांच्यावर थेट निशाणा
शरद पवारImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 22, 2024 | 5:15 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून आता नातवानेच आजोबावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांचे चिरंजीव आणि शरद पवार यांचे नातू जय पवार यांनी शरद पवार यांना सवाल केला आहे. अजितदादांनी पहाटेच्या शपथविधीचा निर्णय मनाने घेतला असता तर त्यांना महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री करण्यात आलं असतं का? साहेब कसे नेते आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे, असा निशाणाच जय पवार यांनी साधला आहे.

जय पवार हे आई सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार करत होते. यावेळी त्यांनी थेट पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यालाच हात घातला. अजितदादांनी अनेक वर्ष साहेबांच सगळंच ऐकलं. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या आधी दादांनी फडणवीसांसोबत शपथविधी केला आणि त्याच दिवशी दुपारी सर्वजण दादांच्या विरोधात गेले. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, जर हा निर्णय दादांचा स्वतःचा निर्णय होता, तर साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये दादांना उपमुख्यमंत्री केलं असतं का? आपल्याला सर्वांना माहिती की साहेब कसे नेते आहेत, असं असतं तर दादांना त्यांनी संधीचं दिली नसती. पण हे खरं कोणी तुम्हाला सांगत नाही, असं मोठं विधान जय पवार यांनी केलं आहे.

साहेबांच्या बाजूनेच का भावनिक व्हायचं?

आज ही निवडणूक त्यांनी भावनिक पद्धतीने चालू केलेली आहे. कारण 15 वर्षे सुप्रियाताई खासदार होत्या. मला काल पुरंदरमधले ही लोक बोलले, जर हे दोन गट झाले नसते तर त्यांच्याकडे बोलायला मुद्देच नव्हते. आता हे दोन गट झाले आहेत म्हणून त्यांना भावनिक बोलावं लागत आहे. साहेबांच्या बाजूनेच का आपण भावनिक व्हायचं, दादांच्या बाजूने का नाही?, असा जय पवार यांनी केला.

तेव्हा कुठे होतं कुटुंब?

दादांवरती ईडीच्या कारवाई चालू होत्या. दादांवर टीका होत होती. तेव्हा दादांबरोबरच साहेबांवरही टीका होत होती. त्यावेळेस दादा भुजबळांसोबत एकटे गेले ईडीच्या कार्यालयात. त्यावेळेस कुठे होते कुटुंब? पण जेव्हा रोहित पवारांवर ईडीची कारवाई झाली तेव्हा त्या ठिकाणी साहेब स्वतः गेले. सुप्रियाताई गेल्या, प्रतिभा आजी स्वतः गेल्या, असा आरोपही त्यांनी केला. दादा गेले अनेक वर्ष आपल्यासाठी दिवस-रात्र काम करतायत, मला असं वाटतंय की आपण दादांसाठी पण कुठंतरी भावनिक झालं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

मीडियाचा वापर करून टीका

फक्त मीडियाचा वापर करून दादांनी काय चुकीचं केलं यावर टीका केली जाते. दादांनी अनेक वर्ष सगळ्यांसाठी कामच केलेलं आहे. अगदी कोरोना काळात मंत्रालयात कुणी नसायचं तेव्हा दादा एकटे जाऊन बसायचे. कुठे काय कमी पडते, कुणाला कायं मदत हवी हे सर्वांना फोन करून पाहात होते. या काळात त्यांना स्वतःला करोना होऊन गेला होता, असं सांगतानाच जेव्हा दादा पूर्ण राज्याच्या कामात व्यस्त होते, तेव्हा सुनेत्रा वहिनींनी बारामतीचा विकास केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या 7 तारखेला घड्याळासमोरच बटन दाबून, वहिनींना प्रचंड बहुमताने विजयी करा, असं आवाहन त्यांनी केलं.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.