कोस्टल रोडवरच्या ‘जय हो’ ट्यूनला महिन्याभरातच फटका ? BMC ने दिले महत्वाचे आदेश

मुंबई कोस्टल रोडवरील 'मेलडी रोड' सुरुवातीला 'जय हो' गाण्यामुळे चर्चेत होता. मात्र, परिसरातील रहिवाशांनी ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी केल्याने बीएमसीने याची दखल घेतली आहे. वाहनांच्या चाकांमुळे निर्माण होणाऱ्या संगीताच्या आवाजाचा परिसरातील जीवनावर परिणाम होत असल्याने, आता ध्वनी पातळी तपासणी (डेसिबल स्टडी) करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोस्टल रोडवरच्या जय हो ट्यूनला महिन्याभरातच फटका ? BMC ने दिले महत्वाचे आदेश
कोस्टल रोड
Image Credit source: social media
| Updated on: Mar 09, 2026 | 11:14 AM

मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोस्टल रोडला (सागरी किनारा मार्ग) गेल्या महिन्यातच मेलडी रोड अशी ओळख मिळाली. या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना, अद्ययावत हंगेरियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील ‘जय हो’ या जगप्रसिद्ध गाण्याची धून ऐकता येते आहे. मुंबईच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या कोस्टल रोडवर मरीन ड्राइव्ह बोगद्यातून बाहेर पडल्यावर अमरसन्स गार्डन ते ब्रिच कँडी दरम्यान पहिल्या मार्गिकेतील सुमारे 700 मीटर रस्त्यावर वाहनचालकांना या मेलडी रोडचा अनुभव घेता येतो. हंगेरियन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या रस्त्यावर विशेष संगीतमय रिब्स (पट्ट्या) बसविण्यात आल्या आहेत. या पट्ट्यांमधील विशिष्ट अंतर आणि त्यावरून जाणाऱ्या वाहनाच्या चाकाचे होणारे घर्षण यामुळे स्वरांची निर्मिती होते. त्यामुळे गाण्याचे हे स्वर त्या वाहनातील प्रवाशांना ऐकू येतात. या नव कल्पनेची खूप चर्चा झाली होती. कोस्टल रोडवरून जात अनेक लोकांनी हे गाणं ऐकण्याचा आनंद लुटला.

मात्र महिन्याभरातच याबद्दल अनेक तक्रारी यायला लागल्या असून ब्रीच कँडी जवळच्या लोकांनी यावर आक्षेप नोंदवला होता. रहिवाशांच्या तक्रारीनंतर मुंबई कोस्टल रोडच्या उत्तरेकडील म्युझिकल रोडचा आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासंदर्भात संभाव्य उपायांची तपासणी करण्याचे निर्देश आता बीएमसीने कन्सलटंटला दिले असून रस्त्यांवरील आवाजाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी ध्वनी डेसिबल अभ्यासा, असे आदेशही दिले आहेत.

गेल्या महिन्यात, 11 फेब्रुवारी रोजी या मेलडी रोडचे उद्घाटन झालेय. ए.आर. रहमान यांच्या “जय हो” गाण्याची धून वाजणारा, विशेष डिझाइन केलेला भारतातला हा पहिला रास्ता आहे. यासाठी बनवण्यात आलेल्या खास रस्त्यावरून जेव्हा वाहनं 70 ते 80 किमी/तास वेगाने जातात, तेव्हा यज हो ची धून गाडीतील लोकांना ऐकायला येते. हे एक नाविन्यपूर्ण ड्रायव्हिंग वैशिष्ट्य म्हणून घोषित करण्यात आलं खरं पण जवळपास राहणाऱ्या लोकांनीच या आवाजाबाबा तीव्र आक्षेप नोंदवला. त्यामुळे इथे आता नॉइज़ डेसिबल स्टडी करण्यात येणार आहे.

टेक्निकल असेसमेंट

नॉईज डेसिबल स्टडी म्हणजे टेक्निकल असेसमेंट असते, ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी आणि तो शहरी वातावरणासाठी निश्चित केलेल्या परवानगीयोग्य मर्यादेत येतो की नाही हे निर्धारित करण्यासाठी केला जातो. साऊंड लेव्हल मीटरसारख्या विशेष उपकरणांचा वापर करून ध्वनी पातळी डेसिबल (dB) मध्ये मोजली जाते. निवासी क्षेत्रांमध्ये, सामान्यतः दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी, आवाजाच्य पातळीचे निरीक्षण केलं जातं, जेणेकरून कोणत्याही ध्वनी स्रोतांमुळे अडथळा निर्माण होत आहे का किंवा पर्यावरणीय ध्वनी मानकांपेक्षा जास्त आहे का हे निर्धारित केले जाऊ शकते. नागरी संस्था आणि पर्यावरण नियामकांना ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी सुधारणा, प्रतिबंध किंवा त्यांचे शमन करण्यासाठी उपाय आवश्यक आहेत की नाही हे ठरविण्यास अशा अभ्यासांचे निकाल मदत करतात.

ब्रीच कँडी भागातील 650 पेक्षा जास्त कुटुंबांची तक्रार

गेल्या महिन्यात ब्रीच कँडी परिसरातील 650 हून अधिक कुटुंबांनी एक औपचारिक तक्रार करत ती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासमोर सादर केल्याचे वृत्त समोर आलं होतं. म्युझिकल रोडमुळे सतत त्रास होत असून त्याचा दैनंदिन जीवनात व्यत्यय येतो, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. जेव्हा त्या रोडवरून वाहनं जातात, तेव्हा निर्माण होणारा आवाज जवळच्या घरांमध्ये पसरतो, ज्यामुळे खिडक्या उघड्या ठेवणे कठीण होते. रहिवाशांनी या म्युझिकल रोडच्या स्थापनेच्या उद्देशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे रहिवाशांना फारसा फायदा होत नाही असंही त्यात नमूद करण्यात आलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us