मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील जोक भोवला, प्रणित मोरे आणि डॉक्टर सेजल पवारला दणका, थेट दोघांनाही..

कॉमेडियन प्रणित मोरे याच्या समस्या काही कमी होत नाहीत. व्हायरल व्हिडीओनंतर प्रणित मोरे याने हात जोडून माफी मागितली. मात्र, त्याच्यावर टीका होत असून त्याचा शो बंद करण्याची मागणी होत आहे. यादरम्यानच आज त्याची चाैकशी होणार आहे.

मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील जोक भोवला, प्रणित मोरे आणि डॉक्टर सेजल पवारला दणका, थेट दोघांनाही..
Pranit More and Dr Sejal Pawar
| Updated on: Jun 16, 2026 | 8:36 AM

कॉमेडियन प्रणित मोरे अडचणीत सापडला आहे. यापूर्वीही त्याच्या शोमधील अश्लील गोष्टींवर त्यांच्यावर टीका झाली. मात्र, यावेळी प्रणित मोरे चांगलाच अडचणीत सापडला. थेट गृह विभागाने प्रणित मोरे याच्या सर्व व्हिडीओ तपासणी करून चाैकशी करण्याचे आदेश दिले. प्रणित मोरे याच्या शोमध्ये दाखल झालेल्या केईएममधील डॉक्टरने थेट मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल धक्कादायक विधान केले, ज्याने वाद सुरू झाला. ही महिला डॉक्टर थेट मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल अश्लील बोलताना दिसली. प्रणित मोरे याने तिला थांबवायचे सोडून थेट तो देखील गोष्ट वाढवताना दिसला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. केईएम रुग्णालयाने देखील व्हायरल व्हिडीओनंतर गंभीर दखल घेतली. एक चाैकशी समितीची स्थापना केली. ज्याच्या प्राथमिक अहवालात केईएममधील डॉक्टर सेजल पवार दोषी ठरली. त्यानंतर केईएमकडून तिच्यावर कारवाई देखील करण्यात आली.

गृह विभागाकडून प्रणित मोरे याच्या आतापर्यंतच्या सर्व अपलोड व्हिडीओची चाैकशी केली जाणार आहे. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच प्रणित मोरे याने अखेर हात सोडले. त्याने झालेल्या प्रकरणात माफी मागितली. हेच नाही तर मी ते थांबू शकलो असतो, असेही म्हणत त्याने चूक मान्य केले. मी चांगला मुलगा आहे, मला अजून एक संधी द्या, असेही प्रणित मोरे याने म्हटले.

आता प्रणित मोरे आणि सेजल पवार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. त्यांना चाैकशीसाठी समन्स पाठवण्यात आला. दोघांचीही चाैकशी केली जाणार आहे. प्रणित मोरे आणि डॉक्टर सेजल पवार यांची समोरासमोर चाैकशी आज केली जाणार आहे. दोघांनीही चाैकशीला हजर राहणार असून सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे.

प्रणित मोरे याच्या शोवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. हेच नाही तर काल काही महिला प्रणित मोरे याच्या सोसायटीमध्ये जाऊन आंदोलन करताना दिसल्या. प्रणित मोरे याचा शो गेल्या काही दिवसांपासून वादात असल्याचे बघायला मिळतंय. त्यामध्येच आता त्याची चाैकशी होणार आहे.

Follow Us