अहिल्यानगरमध्ये मोठा राडा; बाळासाहेब थोरात प्रांत अधिकाऱ्यांवर भडकले, म्हणाले, ‘आमदार शिव्या देता म्हणून…’

अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये मोठा राडा झाला. बाळासाहेब थोरात प्रांत अधिकाऱ्यांवर भडकले. त्यांनी अनेक सवाल प्रांत अधिकाऱ्यांना केले.

अहिल्यानगरमध्ये मोठा राडा; बाळासाहेब थोरात प्रांत अधिकाऱ्यांवर भडकले, म्हणाले, आमदार शिव्या देता म्हणून...
balasaheb thorat news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 22, 2026 | 2:59 PM

अहिल्यानगरमध्ये मोठा राडा झाला आहे. अहिल्यानगरमध्ये वीज प्रश्नी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात मोर्चा  काढण्यात आला. परंतु यावेळी प्रांताधिकारी कार्यालयात नसल्याने मोर्चेकरी संतप्त झाले. आंदोलकांनी खाली या खाली या…असं म्हणत घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांसहित बाळासाहेब थोरात यांचाही पारा चढला. त्यानंतर बाळासाहेब थोरात हे प्रांत अधिकाऱ्यांवर भडकल्याचे दिसून आले.

अहिल्यानगरमध्ये आंदोलनादरम्यान बाळासाहेब थोरात यांनी प्रांत अधिकाऱ्यांवर राग व्यक्त केला. थोरात म्हणाले, आमदार शिव्या देतो म्हणून त्याचे गुलाम झालात का?दादागिरीने तुम्ही गुलाम होत असाल, तर लोकं तेच करतील.आमदाराचा फ्लेक्स लावायला तुम्ही कशाला जायचे? असे प्रश्न करत थोरात अधिकाऱ्यांवर संतापले. संगमनेरमध्ये निवेदन घेण्यासाठी प्रांत अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांसह बाळासाहेब थोरात संतापले. प्रांत अधिकारी उपस्थित झाल्यानंतर थोरातांनी खडेबोल सुनावले. अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलकांनी थेट खुर्ची फेकली

संतापलेल्या आंदोलकांनी प्रांत अधिकाऱ्यांची खुर्ची फेकली. आंदोलक आक्रमक झाले होते. त्यांनी थेट कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. निवेदन घेण्यासाठी प्रांत अधिकारी न आल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची प्रमुख मागणी करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलकांचा रोष पाहता प्रांत अधिकारी अरूण मुंडे आंदोलनस्थळी दाखल झाले. प्रांत अधिकारी आणि वीज वितरण अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.

आंदोलनादरम्यान बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

‘खोट्या बातम्या द्यायच्या दिशाभूल करायची असा सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. शेतकरीच नव्हे तर शेतमजुराला देखील मदत झाली पाहिजे.पंचनामे न करता सरसकट पाऊस नसल्याने सरसकट मदत दिली पाहिजे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना देखील वीज नसल्याने पाणी मिळत नाही.आमच्या त्यावेळी केलेल्या लढाईमुळे संगमनेरला 30 टक्के पाणी मिळालं. अजूनही शेतकरी जागा व्हायला तयार नाही.आम्ही निळवंडे धरण कस पूर्ण केलं हे आम्हाला माहिती आहे.धरणाच्या कालव्यांना सिमेंट काँक्रेट केल्याने विहिरात पाणी उतरत नाही.हक्क मिळाला नाही तर ठिय्या मांडण्याची तयारी आता आपण सर्वांनी ठेवावी. इथल्या निष्क्रिय माणसाची चर्चा करण्यात अर्थ नाही. पाण्यावर एक शब्द तरी हा गडी बोलला का? काय केलं तर गावभर फ्लेक्स लावले.. फ्लेक्स लावून शेतकऱ्याचे पोट भरणार नाही, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी आमदार अमोल खताळ यांच्यावर टीका केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us