AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जोपर्यंत खुर्चीवर… हर्षवर्धन सपकाळ नको ते बोलून गेले, पंतप्रधानांवर बोलताना तोडल्या सर्व मर्यादा

Sapkal vs Modi : आज नाशिकच्या चांदवड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हमीभाव मिळावा या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे.

जोपर्यंत खुर्चीवर... हर्षवर्धन सपकाळ नको ते बोलून गेले, पंतप्रधानांवर बोलताना तोडल्या सर्व मर्यादा
Sapkal on ModiImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 26, 2026 | 2:54 PM
Share

गेल्या काही काळापासून शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. गेल्या वर्षी झालेल्या गारपीटीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर आता कांदा आणि इतर पिकांना कवडीमोल भाव मिळत आहे. अशातच आज नाशिकच्या चांदवड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हमीभाव मिळावा या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला. कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव मिळाला तर आमचा खर्च वजा होऊन दोन पैसे हाती लागतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या मोर्चा विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी भाषणात पंतप्रधान मोदींवर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाले सपकाळ?

चांदवडमधील शेतकऱ्यांच्या मोर्चात भाषण कराताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सरकार तुपाशी शेतकरी उपाशी अशी अवस्था आहे. मी तुमचा कांदा खाल्ला आहे, मी बेइमानी करणार नाही. नालायक म्हणायचे ह**** म्हणायचे, कांदाखोर म्हणायचे, असे हे नालायक सरकार आहे. फडणवीस तर गद्दार माणूस आहे. 24 रुपयांनी कांदा खरेदीचे आश्वासन दिलेले होते. फडणवीस म्हणाले होते वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही आणि लग्न केले. त्यामुळे ते महाराष्ट्राचे खोटारडे मुख्यमंत्री आहेत.

पंतप्रधान मोदींवर टीका

पुढे बोलताना पंतप्रधान मोदींवर बोलताना सपकाळ म्हणाले की, मोदी यांनी आजू-बाजूच्या देशांसोबत **** घेतली आहे. जो पर्यंत **** खुर्चीवर आहे तो पर्यंत कांदा आयात होणार नाही. बांगलादेश श्रीलंका आपला कांदा घेणार नाही. नरेंद्र हा **** आहे. एपस्टीन फाईलमध्ये मोदींनी काय काय केलं ज्यामुळे ते ट्रम्प यांचे ऐकत आहेत? मोदींमुळे आपले चांगले होऊ शकत नाही. कांदा खरेदी आता APMC मधेच झाली पाहिजे. झोपेच सोंग करणारे खोट सरकार आहे. मोदींना बैलगाडीत बसून त्याची हिमालयात विल्हेवाट लावा.

अनेक विरोधी नेते उपस्थित

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे, आमदार रोहित पवार, खासदार शोभाताई बच्छाव, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, रमेश कहांडोळे, शहराध्यक्ष बबलू खैरे तसेच महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट