अभिनेता इम्रान खानवरील कारवाईवरून राजकारण पेटलं; अमेरिकेला जाण्याच्या आदेशावर काँग्रेसमधून तिखट प्रतिक्रिया

अभिनेता इम्रान खानवरील कारवाईवरून राजकारण पेटलं आहे. आता इम्रानला खानला अमेरिकेला जाण्याच्या आदेशावर काँग्रेसमधून तिखट प्रतिक्रिया समोर आली आहे.

अभिनेता इम्रान खानवरील कारवाईवरून राजकारण पेटलं; अमेरिकेला जाण्याच्या आदेशावर काँग्रेसमधून तिखट प्रतिक्रिया
IMRAN KHAN
Image Credit source: IMRAN KHAN
| Updated on: Oct 15, 2026 | 12:15 PM

बॉलिवूड अभिनेता इम्रान खान हा सध्या चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने मुंबईतील आंदोलनात सहभाग नोंदवला होता. सध्या देशात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. मुंबईतील याच एका आंदोलनात इम्रान खान सहभागी झाला होता. परंतु अमेरिकेचं नागरिकत्व असलेल्या इम्रान खानला सरकारने मोठा झटका दिला आहे.  सरकारच्या एका आदेशाने इम्रान खानला देश सोडून जावे लागणार आहे. यावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोले यांनी मोदी सरकरावर टीका केली आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाना पटोले म्हणाले, ‘ देशामध्ये देशाच्या जनतेला…इम्रान खान नव्हेच, जो कोणी सरकारच्या विरोधात बोलेल. तो देशद्रोही राहील, अशी भूमिका सरकारमध्ये बसलेल्या लोकांची झाली आहे. देशद्रोही म्हणजे कोण, देशातील 32 कोटी लोकांची नावे हेतपूर्वक जाती-धर्मांच्या आधारे एसआयआरच्या माध्यमातून मतदार यादीतून काढली जात आहेत. लोकांचे व्यक्तीस्वातंत्र, मतांचा अधिकार हिरावले जात आहेत. जे संविधान मानत नाही, असे लोक सरकारमध्ये बसले आहेत. अशा लोकांना तुम्ही देशद्रोही म्हणायचं का? आता आंदोलन करायचं असेल. त्याला आता पैसे भरावे लागतात. आता सरकारच्या विरोधात बोलायचं असेल, तर तुम्हाला पैसे भरावे लागणार आहे. ही कुठली लोकशाही आहे. स्वातंत्र्य भारतात देशात प्रत्येक नागरिकांना मत मांडण्याचा अधिकार नसेल, तर भारतात हुकूमशाही चालवण्याचं काम सुरू आहे. देशात 32 कोटी लोकांची नावे वगळून एक प्रकारने सरकारने देशद्रोह केला आहे’.

Loading...

सरकारची नोटीस काय?

इम्रान खानला भारत देश सोडण्याची नोटीस धाडली आहे. त्याला इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्टच्या कलम 7 आणि कलम 29 अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटीसमधून 28 ऑक्टोबरआधी देश सोडावा, अशा सूचना त्याला देण्यात आल्या आहेत. परदेशी नोंदणी कार्यालयाने त्याला नोटीस जारी केली आहे. त्यामुळे आता त्याला भारत सोडावा लागणार आहे.  या निर्णयाने इम्रान खानच्या करिअरवर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us