
Nashik News : नाशिकमधील शिंदे (Shinde) आणि ठाकरे (Thackeray) गटाचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमधून पाठ फिरत नाही तोच कामगार सेनेच्या ( NMC Worker Sena) कार्यालयाच्या ताब्याचा वाद उभा राहीला आहे. महापालिकेतील कामगार सेनेच्या कार्यालयाच्या ताब्याचा वाद हा व्हाया कामगार आयुक्तालय ते पोलीस ठाण्यापर्यन्त जाऊन पोहचला आहे. ठाकरे गटाचे महानगर प्रमुख आणि शिंदे गटाचे महानगरप्रमुख यांच्यात हा वाद सुरू आहे. ठाकरे गटाचे महानगरप्रमुख यांनी पालिकेतील कार्यालयाचा परस्पर ताबा घेऊन कागदपत्रे गहाळ केल्याचा आरोप केल्याने दोन्ही गटातील वाद विकोपाला गेला आहे. तिदमे यांनी हा आरोप करत पोलीस ठाण्यात 150 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महापालिकेतील कामगार सेनेच्या अध्यक्षपदी कोण हा वाद सुरुवातीला निर्माण झाला होता. त्यावरून नाशिक महानगर पालिकेच्या कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरूनचा वाद पोलीस ठाण्यापर्यन्त पोहचलयाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
नाशिक महानगर पालिकेत शिवसेना प्रणीत म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाचा वाद पोलीस ठाण्यापर्यन्त हा वाद जाऊन पोहचला आहे.
शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आहे, तर ठाकरे गटाच्या महानगरप्रमुख पदी सुधाकर बडगूजर यांची निवड झाली आहे.
विशेष म्हणजे दोघांचीही नाशिक महानगर पालिकेत शिवसेना प्रणीत म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या अध्यक्षपदी निवड असल्याचा दावा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असतांना सुधाकर बडगूजर यांनी कार्यालयात प्रवेश करत अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.
यावरुनच प्रवीण तिदमे यांनी ठाकरे गटाचे बडगूजर यांच्यासह 150 जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात केली आहे.
यामध्ये २१ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात असताना बडगुजर यांनी परस्पर माझे कार्यालयही ताब्यात घेतल्याचे तिदमे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.
सुधाकर बडगुजर, रवि येडेकर यांसह सुमारे १०० ते १५० लोकांनी प्रवेश करत महत्त्वाची कागदपत्रे गहाळ केल्याची तक्रार केली आहे.
एकूणच ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद मोठ्या प्रमाणात रंगला असून पोलीस ठाण्यात पोहचला आहे, त्यामुळे येत्या काळात पोलीस काय कारवाई करतात हे बघणे महत्वाचे आहे.