शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, पोलीस पाटलासह व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर गुन्हा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर गलिच्छ भाषेत आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला (Controversial text about Sharad Pawar in Whats app Group) आहे.

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, पोलीस पाटलासह व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर गुन्हा

मनमाड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर गलिच्छ भाषेत आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला (Controversial text about Sharad Pawar in Whats app Group) आहे. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन आणि ग्रुपमधील सदस्याचा समावेश आहे.  ही घटना मनमाड येथील चांदवड तालुक्यातील देवरगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला (Controversial text about Sharad Pawar in Whats app Group)  आहे.

गलिच्छ भाषेत आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे देवरगावच्या पोलीस पाटलासह ग्रुप अ‍ॅडमिनवर गुन्हा दाखल केला आहे. माणिक संपत शिंदे असं पोलीस पाटलाचे नाव आहे. तर कमलाकर शिंदे असं ग्रुप अ‍ॅडमिनचे नाव आहे. माणिक शिंदे यांनी एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पवारांबद्दल गलिच्छ भाषेत मजकूर टाकला होता, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

त्यानंतर या ग्रुपमधील काही लोकांनी या घटनेचा निषेध केला. तसेच या विरोधात चांदवड तालुक्याचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दीपक शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वडणेरभैरव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोलीस पाटील माणिक शिंदेला निलंबित करा, अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या :

शरद पवारांचं विधान मोदींविरोधी नव्हे तर श्रीरामांविरोधात, पवार तर रामद्रोही : उमा भारती

उद्धव ठाकरेंना राम मंदिर भूमिपूजनासाठी पवारांच्या NOC ची गरज नसावी : प्रवीण दरेकर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *