Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचं थैमान, आकडा 52 हजार 667 वर

राज्यात आज दिवसभरात 1,186 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात 15 हजार 786 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचं थैमान, आकडा 52 हजार 667 वर

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा कहर (Corona Cases In Maharashtra) सुरुच आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्या आता 52 हजारांच्या पार गेली आहे. आज राज्यात नव्या 2 हजार 436 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 52 हजार 667 वर पोहोचली (Corona Cases In Maharashtra) आहे.

राज्यात आज दिवसभरात 1,186 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात 15 हजार 786 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या राज्यात 35 हजार 178 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दिवसभरात राज्यात 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

आज राज्यात 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1 हजार 695 वर पोहोचला आहे. आज मृत्यू झालेल्यांपैकी मुंबईत 38, पुण्यात 11, नवी मुबंईत 3, ठाणे शहरात 2, औरंगाबादेत 2, सोलापुरात 1, कल्याण डोंबिवलीत 1, रत्नागिरीत 1 मृत्यू झाला आहे.

राज्यात 5 लाख 30 हजार 247 जण होम क्वारंटाईनमध्ये

आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 78 हजार 555 नमुन्यांपैकी 3 लाख 25 हजार 888 जणांचे प्रयोगशाळा नमूने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. तर 52 हजार 667 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 30 हजार 247 जण होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार 479 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Corona Cases In Maharashtra) आहेत.

मुंबई दिवसभरात 1 हजार 430 रुग्णांची वाढ

मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 430 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता 31 हजार 972 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात एकूण 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 1026 झाली आहे.

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजारांच्या पार

पुणे शहरात सोमवारी तब्बल 399 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली. आतापर्यंतचे एका दिवसातील ही विक्रमी नवीन रुग्णवाढ आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या रुग्णांच्या संख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 5 हजार 181 वर बाधित रुग्णांची संख्या पोहोचली. तर दिवसभरात दहा बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळं आतापर्यंत 264 बाधित रुग्ण दगावलेत. तर दिवसभरात 175 रुग्ण डिस्चार्ज झाले. आतापर्यंत 2735 रुग्ण डिस्चार्ज झाले असून ऍक्टिव्ह रुग्णांपेक्षा घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. पुण्यात सध्या 2182 ॲक्टिव रुग्ण असून 179 क्रिटिकल आणि 44 व्हेंटिलेटरवर आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई123382965866499
पुणे (शहर+ग्रामीण)113004699302728
ठाणे (शहर+ग्रामीण)104935810953008
पालघर 1840812179424
रायगड2014315658510
रत्नागिरी2119140578
सिंधुदुर्ग4893469
सातारा56793482172
सांगली46871986124
नाशिक (शहर +ग्रामीण)2059712621569
अहमदनगर (शहर+ग्रामीण)9111492897
धुळे40632541127
जळगाव 144389767611
नंदूरबार 92351543
सोलापूर117126841580
कोल्हापूर 88853347218
औरंगाबाद1629810660545
जालना2460161886
हिंगोली 78654617
परभणी102846039
लातूर 36381535146
उस्मानाबाद 224985862
बीड167155531
नांदेड 30811083107
अकोला 29812447129
अमरावती 2809193082
यवतमाळ 146696044
बुलडाणा 1900109052
वाशिम 93056118
नागपूर85852756230
वर्धा 2801779
भंडारा3722432
गोंदिया 5443144
चंद्रपूर7353821
गडचिरोली4203082
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)524054
एकूण51533235171017757

Corona Cases In Maharashtra

संबंधित बातम्या :

Corona Update | पनवेलमध्ये 22 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांची संख्या चारशेच्या दिशेने

कांदे-बटाटे ते साबण-तेल, किराणा माल घरपोच, 51 शिक्षकांना ‘डिलिव्हरी बॉय’चं काम

Pune Corona | पुण्यात दिवसभरात 205 नवीन कोरोना रुग्ण, बाधितांची संख्या 5,899 वर

Thane Corona | कोरोनाची टेस्ट बंधनकारक, पैसे नसल्याने कळवा पालिका रुग्णालयात नोंद, रुग्णालयात जाताना रस्त्यातच प्रसुती

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *