कांदे-बटाटे ते साबण-तेल, किराणा माल घरपोच, 51 शिक्षकांना 'डिलिव्हरी बॉय'चं काम

अकोल्यात दारुच्या दुकानांवरील गर्दी नियंत्रणासाठी शिक्षकांना जुंपलं असताना, आता बीडमध्ये शिक्षक आता 'डिलिव्हरी बॉय'च्या भूमिकेत दिसणार आहेत. (Beed Teachers duty as delivery boy)

कांदे-बटाटे ते साबण-तेल, किराणा माल घरपोच, 51 शिक्षकांना 'डिलिव्हरी बॉय'चं काम

(प्रातिनिधीक फोटो)

बीड : कोरोनाच्या काळात लॉकडाऊनदरम्यान शिक्षकांना काय काय करण्याची वेळ येईल हे सांगता येत नाही. अकोल्यात दारुच्या दुकानांवरील गर्दी नियंत्रणासाठी शिक्षकांना जुंपलं असताना, आता बीडमध्ये शिक्षक आता ‘डिलिव्हरी बॉय’च्या भूमिकेत दिसणार आहेत. (Beed Teachers duty as delivery boy)

बीड जिल्ह्यातील पाटोदाच्या तहसीलदारांनी शिक्षकांना नगरपंचायतीच्या हद्दीत राहणार्‍या नागरिकांना, किराणा माल तसेच जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचे काम दिले आहे. त्यामुळे आता 51 शिक्षकांना ‘डिलिव्हरी बॉय’ची कामे करावी लागणार आहेत. (Beed Teachers duty as delivery boy)

राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे लॉकडाऊन जारी करत साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सरकारी कर्मचार्‍यांच्या सेवा कोरोनाविरोधी लढ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

यानुसार पाटोद्याच्या तहसीलदारांनी पाटोदा नगरपंचायत परिसरातील नागरिकांसाठी 51 शिक्षकांची ड्युटी डिलिव्हरी बॉय म्हणून लावली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार अन्नधान्य, भाजीपाला, किराणा मालसोबतच जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी हे शिक्षक शुक्रवारपासून कार्यरत आहेत.

या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी केल्यास दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याचे सत्र सुरुच असल्याचे समोर आलं आहे.

संबंधित बातम्या 

मुंबई मनपा शाळेचे शिक्षक कोरोना योद्धा | मुंबई महापालिकेने दिले आदेश

रायगडातील 4 हजार प्राथमिक शिक्षक झाले ‘कोरोना वॉरियर्स’ 

Corona | विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द, शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची परवानगी : उदय सामंत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *