नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण चक्क 400 पर्यंत खाली

नाशिककरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असून आता चक्क रुग्णसंख्या अवघ्या 400 पर्यंत खाली आली आहे.

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण चक्क 400 पर्यंत खाली
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 12:30 PM

नाशिकः नाशिककरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असून आता रुग्णसंख्या अवघ्या 400 पर्यंत खाली आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 474 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 28 ने घट झाली आहे . तसेच आत्तापर्यंत 8 हजार 691 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

येथे पॉझिटिव्ह रुग्ण

उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 38, बागलाण 6, चांदवड 12, देवळा 12, दिंडोरी 2, इगतपुरी 2, कळवण 4, मालेगाव 7, नांदगाव 3, निफाड 74, सिन्नर 38, त्र्यंबकेश्वर 1, येवला 22 असा एकूण 221 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 154, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 9 तर जिल्ह्याबाहेरील 16 रुग्ण असून असे एकूण 400 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 565 रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

नाशिक जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.19 टक्के, नाशिक शहरात 98.22 टक्के, मालेगावमध्ये 97.11 टक्के, तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.79 इतके आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 691 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात नाशिक ग्रामीण 4 हजार 207 नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 रुग्णांचा समावेश आहे.

30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरण

नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील कालच 22 भावी पोलीस उपनिरीक्षक कोरोनाबाधित आढळले असून, त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण 45 लाख 12 हजार 691 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 32 लाख 90 हजार 262 जणांनी पहिला डोस घेतला असून 12 लाख 22 हजार 429 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. दरम्यान, येत्या 30 नोव्हेंबर 100 टक्के कोरोना लसीकरण करावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यात विक्रमी लसीकरण करणाऱ्या नाशिक विभागात येत्या काळात या मोहिमेची गती अजून वाढणार आहे.

मास्क वापराच

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र, नागरिकांनी तरीही मास्क वापरावा. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन करावे. त्यामुळे रुग्णसंख्या शून्यावर येण्यास मदत होईल. शक्यत तितक्या जास्तीत जास्त नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका आणि आरोग्य विभागाने केले आहे.

इतर बातम्याः

Malegaon हिंसाचाराची भयंकर साखळीः 1 नगरसेवक, 1 आक्षेपार्ह क्लिप, 4 जणांकडून Viral

राज्यात सारं निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून, आम्ही जुळवून घेतलंय, तुम्ही दिवस मोजा; शरद पवारांचा थेट इशारा!

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.