AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काकडेंना उमेदवारी देताच राष्ट्रवादीत मोठा ड्रामा… निष्ठावंतांची खदखद, नाराजी आणि राजीनामा… पुण्यात मोठ्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काकडेंना उमेदवारी दिल्याने पुण्यात मोठा राजकीय ड्रामा सुरू झाला आहे. निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त करत खदखद मांडली आहे, तर सुनील टिंगरे आणि रामदास गाडे यांनी राजीनामा दिला आहे. या घडामोडींमुळे पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासमोरील आव्हान वाढले असून, काकडेंना निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.

काकडेंना उमेदवारी देताच राष्ट्रवादीत मोठा ड्रामा... निष्ठावंतांची खदखद, नाराजी आणि राजीनामा... पुण्यात मोठ्या घडामोडी
| Updated on: Jun 01, 2026 | 1:48 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील निष्ठावंताची खदखद समोर आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांनी नाराजी दाखवली आहे. एका नेत्याने तर थेट राजीनामा दिला आहे. तर दुसऱ्या नेत्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांची मोठी डोकेदुखी वाढणार असून काकडेंना ही निवडणूक जड जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पुण्याय या नाराजी नाट्यामुळे मोठा ड्रामा निर्माण झाला असून ही नाराजी कशी दूर केली जाते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीला महायुतीत पुणे आणि कोकणची जागा सुटली आहे. कोकणमधून अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर पुण्याच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पुण्याच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी सकाळी 9 वाजल्यापासून जिजाई बंगल्यावर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेकांनी तिकीटाची मागणी केली. पण या सर्वांना डावलून ऐनवेळी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यास पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. हा विरोध डावलून त्यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील निष्ठावंतांची खदखद समोर आली आहे.

टिंगरेंसाठी राजीनामा

काकडे यांना उमेदवारी मिळताच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली आहे. थोड्यावेळात टिंगरे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर टिंगरे यांच्या भूमिकेला रामदास गाडे यांनी पाठिंबा दिला आहे. टिंगरे यांना उमेदवारी न मिळाल्याच्या निषेधार्ध गाडे यांनी राष्ट्रवादीतील सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तर अनेक पदाधिकाऱ्यांनी काकडेंच्या उमेदवारीला विरोध करत जाहीर निषेध नोंदवला आहे.

मी नाराज आहे

राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष सुरेश घोले यांनीही काकडेंच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली आहे. मी 12 वर्षापासूनपासून पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. साखर कारखान्याचा चेअरमन होतो. मार्केट कमिटीचा चेअरमन होतो. मी पक्षात सर्वात वरिष्ठ आहे. ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितली त्या सर्वांमध्ये मी सीनिअर आहे. मला उमदेवारी हवी होती. मी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या कानावर ही माहिती दिली. पण मला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे मी नाराज आहे, असं सुरेश घोले म्हणाले.

निष्ठावंतांना तिकीट न दिल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मी 40 वर्ष अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. मी सर्वात सीनिअर आहे. मी प्रचंड काम केलं. मला उमेदवारी देण्याचा आग्रह होता. पण पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांनी उमेदवारी दिली नाही. मी किती काम करतो हे सर्वांना माहीत आहे. मला उमेदवारी दिली नाही. मला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. माझी नाराजी आहे. याबाबत मी लवकरच वहिनी आणि पार्थ पवारांशी बोलणार आहे, असंही घोले म्हणाले.

Follow Us
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन