नमो शेतकरी योजना आणि अग्रीम रक्कम एकच, भरणेंचं विधान, स्पष्टीकरण विचारल्यावर म्हणाले अर्थ खात्याकडे…

आता जी 5 हजार रुपयांची रक्कम प्रति शेतकऱ्याला दिली आहे. शेवटी रक्कम तीच आहे, एकच आहे. ती काही वेगळी रक्कम नाहीये. पण आपण शेतकऱ्यांना नमो योजनेचेही पैसे देणार आहोत, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.

नमो शेतकरी योजना आणि अग्रीम रक्कम एकच, भरणेंचं विधान, स्पष्टीकरण विचारल्यावर म्हणाले अर्थ खात्याकडे...
datta bharne
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 4:24 PM

गजानन देशमुख, टीव्ही 9 मराठी, नांदेड : राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळाने होरपळलाय. खरीप हंगामातील पीक हातातून गेले आहे. पेरणी करूनही पीक न आल्याने शेतकरी हलबल आहे. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं वारंवार राज्य सरकारकडून सांगितलं जातंय. दिवाळीआधी आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असं सरकारने सांगितलं होतं. याच आश्वासनानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट 5000 रुपयांची अग्रीम रक्कम देऊ केली होती. ही रक्कम काही शेतकऱ्यांना मिळालेली आहे, तर काही शेतकरी अजूनही या लाभापासून वंचित आहेत. काही शेतकरी या लाभापासून वंचित असतानाच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नमो शेतकरी योजना आणि अग्रीम रक्कम एकच आहे, असं विधान केलंय.

पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम ही…

दत्तात्रय भरणे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलतान राज्य सरकार तर्फे दिली जाणारी नमो शेतकरी सन्मान योजना आणि अग्रीम रक्कम एकच आहे, अशा आशयाची प्रतिक्रिया दत्ता भरणे यांनी दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे शेतकऱ्यांना दिलेली पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम ही शेतकरी सन्मान योजनेतून दिली का? असा प्रश्न निर्माण झालाय. कृषमंत्री भरणे नांदेड विमानतळावर बोलत होते.

Loading...

नेमक काय म्हणाले कृषीमंत्री काय म्हणाले?

आता जी 5 हजार रुपयांची रक्कम प्रति शेतकऱ्याला दिली आहे. शेवटी रक्कम तीच आहे, एकच आहे. ती काही वेगळी रक्कम नाहीये. पण आपण शेतकऱ्यांना नमो योजनेचेही पैसे देणार आहोत. आपण ते पैसे देणार नाही असं काही नाहीये. आपण तो प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठवला आहे. असे भरणे यांनी स्पष्ट केले. भरणे यांच्या या उत्तरावर अग्रीम म्हणून दिलेली 5 हजाराची रक्कम नमो शेतकरी योजनेची आहे का? असा सवाल पत्रकाराने विचारला असता असं म्हणता येणार नाही, असं पुढे भरणे यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us