दत्तात्रय भरणेंचे कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय मल्लांना आव्हान, म्हणाले ‘मी पैलवान, सगळे डाव जमतात’

| Updated on: Oct 25, 2021 | 1:14 PM

मी छोटा पैलवान आहे. मात्र मला इतका सोपा समजू नका. डावाला प्रतिडाव टाकायची माझ्यात ताकद आहे. मला सगळं जमतं. भलेभले डाव कसे उलथवून लावायचे याची मला सर्व माहिती आहे" असे सूचक वक्तव्य राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

दत्तात्रय भरणेंचे कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय मल्लांना आव्हान, म्हणाले मी पैलवान, सगळे डाव जमतात
DATTATRAY BHARANE
Follow us on

पुणे (इंदापूर) : “मी छोटा पैलवान आहे. मात्र मला इतका सोपा समजू नका. डावाला प्रतिडाव टाकायची माझ्यात ताकद आहे. मला सगळं जमतं. भलेभले डाव कसे उलथवून लावायचे याची मला सर्व माहिती आहे” असे रोखठोक वक्तव्य राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी इंदापूर तालुक्यात निवड चाचणी घेण्यात येत आहे. या निवड चाचणी कार्यक्रमाचे भरणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी वरिल भाष्य केलं

शाळा, अभ्यास करत पैलवानकी केली

यावेळी बोलताना “मी पुण्यात शिकत असताना शिवाजी मराठा हायस्कूलला होतो. तिथे चिंचेची तालीम होती. तिथला मी पण पैलवान आहे. मी छोटा पैलवान आहे. शाळा, अभ्यास करत मी काहीवेळ पैलवानकी केलेली आहे. यासाठी मला घरून खुराख येत होता,” अशी आठवण भरणे यांनी सांगितली.

मला सगळे डाव जमतात

तसेच, “मी छोटा पैलवान आहे, मात्र मला इतका सोपा समजू नका, डावाला प्रतिडाव टाकायची माझ्यात ताकद आहे. मला सगळं जमतं. भलेभले डाव आले तर ते कसे उलथून टाकायचे ते मला माहीत असते. पण मात्र मी कधी बोलून दाखवत नाही. पैलवानकी बरोबर मी कबड्डीचादेखील खेळाडू आहे. त्यामुळे मला सगळे डाव जमतात,” असे भरणे म्हणाले. त्यांच्या या मिश्किल भाष्यानंतर सभेमध्ये एकच हशा पिकला. शेवटी उपस्थित पैलवानांना शुभेच्छा देत राज्यमंत्री पुढच्या नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले.

इतर बातम्या :

एनसीबीला खोटे ठरविण्यासाठी आता व्हिडीओ क्लिपचा आधार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा आरोप

‘सत्तेसाठी सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करु नये’ भातखळकरांचा राऊतांना टोला

मागासवर्गीय असल्यानेच समीर वानखेडेंना टार्गेट केलं जातंय; रामदास आठवलेंचा आरोप