AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी उपयोजना करा; उपमहापौर हिराबाई घुले यांची आयुक्तांना सूचना

कोरोनाच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली ,असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. या विषाणूची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून काळजी घ्यावी. दक्ष रहावे. आत्तापासूनच उपाययोजना हाती घ्याव्यात

कोरोनाच्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी उपयोजना करा; उपमहापौर हिराबाई घुले यांची आयुक्तांना सूचना
पिंपरी चिंचवड महापालिका
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Nov 29, 2021 | 6:40 PM
Share

पिंपरी- कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने निर्बंध शिथिल केल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असताना आता कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पिंपरी-चिंचवड शहरातील अनेकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये युवकांची संख्या अधिक होती. दुसऱ्या लाटेत शहराची मोठी हानी झाली. त्यामुळे कोरोनाच्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू कराव्यात. औषधे, ऑक्सिजनचा साठा मुबलक ठेवावा. अनेकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला नाही. त्यांचे घरोघरी जाऊन लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचना उपमहापौर हिरानानी घुले यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

शहरातील रुग्णसंख्या शंभरच्या आत आली होती. सर्व निर्बंध शिथिल झाले होते. सर्व व्यवहार सुरळीत झाले. रुग्णसंख्या घटल्याने आनंदाचे वातावरण होते. नागरिकांनाही मास्क घालणे, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर कमी केला होता. प्रशासनही ‘रिलॅक्स’ झाले होते. पण, कोरोनाचा नवीन विषाणू आला आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली ,असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. या विषाणूची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून काळजी घ्यावी. दक्ष रहावे. आत्तापासूनच उपाययोजना हाती घ्याव्यात, याबाबत उपमहापौरांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.

ऑक्सिजनचा साठा मुबलक ठेवा

दुसऱ्या लाटेत शहरातील युवकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त होते. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली. दुसऱ्या लाटेने मोठे नुकसान झाले. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेचा महापालिका प्रशासनाला अनुभव आहे. दुसऱ्या लाटेत आपण कुठे कमी पडलो. याचा अभ्यास करावा. त्यानुसार सुविधांमध्ये वाढ करावी. औषधांची उपलब्धता वाढवावी. ऑक्सिजनचा साठा मुबलक ठेवावा. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने नागरिक गाफील झाले होते. त्यामुळे मास्क घालणे,वारंवार हात धुण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई करावी. शहरातील 25 लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. पण, त्यातील अनेकांचा दुसरा डोस झाला नाही. दुसरा डोस बाकी असलेल्या नागरिकांना शोधून त्यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करावे, अशी सूचना उपमहापौर हिरानानी घुले यांनी केली.

Omicron : ओमिक्रोन जोरदार वेगानं हातपाय पसरतोय, आतापर्यंत जवळपास दीड डझन देशात ओमिक्रोनचा प्रसार

धुळ्यात पाहुण्या पक्ष्यांचे आगमन; नदी, तलावासह पाणथळे फुलले

कुख्यात गँगस्टर अमित भोगलेला बेड्या, दोन देशी पिस्तूल, 8 जिवंत काडतुसे, शस्त्र जप्त, मुंबई पोलिसांची कारवाई!

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...