धुळ्यात पाहुण्या पक्ष्यांचे आगमन; नदी, तलावासह पाणथळे फुलले

जिल्ह्यातील पानथड्यांवर लालसरी शेंडी बदक, पिनटेल, रेड क्रेस्टेड ग्रीब, कॉमन पोचार्ड, वूड सँडपायपर, कंठेरी चिखल्या, चमचचोचे हे पाणपक्षी, तर थीरथीरा निलय या सारखे रानपक्षी परिसरात आढळून येत आहे.

धुळ्यात पाहुण्या पक्ष्यांचे आगमन; नदी, तलावासह पाणथळे फुलले
धुळ्यात पाहुण्या पक्ष्यांचे आगमन
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 6:25 PM

धुळे : वातावरणात बदल होऊन थंडीत वाढ होत आहे. त्यामुळे थंडीत स्थलांतर करणारे विविध पाहुण्या पक्ष्यांच्या हजेरीने नदी, तलावासह पाणथळे फुलून निघाली आहेत. जिल्ह्यातील पांझरा नदी, नकाने तलाव, ललिंग येथे छोटी अडई बदकांसह विविध पक्षी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. शहरातील पक्षी निरीक्षकांनी नुकत्याच केलेल्या पाहणीत विविध प्रजातींचे पक्षी मोठ्या संख्येने जलाशयांवर आढळल्याची माहिती मिळाली आहे. जांभळी पाणकोंबडी काळ्या डोक्याचा शराटी, देव ससाणा असे स्थलांतरित पक्षी आढळल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे.

विविध प्रकारच्या रानपक्ष्यांचे आगमन

जिल्ह्यातील पानथड्यांवर लालसरी शेंडी बदक, पिनटेल, रेड क्रेस्टेड ग्रीब, कॉमन पोचार्ड, वूड सँडपायपर, कंठेरी चिखल्या, चमचचोचे हे पाणपक्षी, तर थीरथीरा निलय या सारखे रानपक्षी परिसरात आढळून येत आहे. शहरातील पक्षी निरीक्षकांच्या मते इतर पाहुण्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे विविध ऋतू नुसार दाखल होणाऱ्या पक्ष्यांचे अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन देखील पक्षीमित्र विशाल महाले व वेदांत बहाळकर यांनी केले आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणेकडूनही प्रयत्न करण्याची गरज आहे.

का येतात पक्षी ?

बर्फाच्छादीत प्रदेशात थंडीने जलाशये गोठतात. पक्ष्यांना अन्नाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे त्यांचा शोध संतुलित सुरक्षित वातावरणातील घरट्यांसाठी सुरू होतो. प्रत्येक पक्षाला सुरक्षित जागा हवी असते. त्यामुळे हिवाळ्यात पक्षी आपल्याकडील वातावरणात निवारा शोधण्यासाठी येतात आणि संपूर्ण हिवाळा येथ वास्तव्य करतात. पक्षांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येथे भेट देतात. देशात मध्य, पूर्व आणि उत्तर दक्षिण युरोप, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, तिबेट येथून पाहुणे पक्षी येतात. मंगोलियातून येणारे पक्षी चार हजाराहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून आपल्या भागात येतात. काही पक्षी 20 हजार ते 54 हजार किलोमीटरचा प्रवास करीत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. (Arrival of different species of birds in Dhule)

इतर बातम्या

मालमत्तेच्या वादातून तरुणाची गळा चिरून हत्या, बंद घरात बेडवर आढळला मृतदेह

Aurangabad: मुलीचे अपहरण करून कपाटात कोंडणारा आरोपी कोठडीत, यापूर्वीही एका बलात्कारात दोषी!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.