Aurangabad: मुलीचे अपहरण करून कपाटात कोंडणारा आरोपी कोठडीत, यापूर्वीही एका बलात्कारात दोषी!

दोन वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिला कपाटात कोंडण्याची घटना औरंगाबादमधील दलालवाडीत घडली. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सदर विकृत इसमाला चांगलाच चोप दिला. आता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Aurangabad: मुलीचे अपहरण करून कपाटात कोंडणारा आरोपी कोठडीत, यापूर्वीही एका बलात्कारात दोषी!
औरंगाबादेत दोन वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिला कपाटात कोंडल्याची घटना

औरंगाबादः दोन वर्षाच्या मुलीला मारहाण करत लाकडी कपाटात कोंडण्याची धक्कादायक घटना शहरात शनिवारी रात्री घडली. दलालवाडीतील या संतापजनक (Crime) प्रकारानंतर नागरिकांनी संबंधित आरोपीला चांगलाच चोप दिला होता. शशिकांत दिलीप भदाणे असे या विकृताचे नाव असून या प्रकरणी क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने विकृत आरोपीला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याच आदेश दिले आहेत.

दोन वर्षाच्या मुलीला कपाटात कोंडले होते

दलालवाडी परिसरात शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका कुटुंबातील दोन वर्षाची चिमुकली बेपत्ता झाली होती. तसेच दलालवाडीतील याच परिसरात नुकताच भाड्याने राहण्यासाठी आलेल्या आरोपीच्या घरातून नागरिकांना लहान मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. दरवाजा बाहेरून बंद होता. स्थानिकांनी तत्काळ दरवाजा तोडून पाहिल्यास कपाटात ती मुलगी आढली. मुलीच्या नाकातून रक्त येत होते. नागरिकांनी तत्काळ तिच्यावर प्राथमिक उपचार करून क्रांती चौक पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान आरोपी बाजूच्याच परिसरात फिरत असल्याचे नागरिकांच्या दृष्टीस पडले तेव्हा लोकांनी त्यालाही चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या तावडीत दिले.

यापूर्वीही केला होता बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांतने 2008 मध्ये एमआयडीसी वाळूज परिसरातील एका पंधरा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार केला होता. त्यात न्यायालयाने शिक्षादेखील ठोठावली. तेव्हापासून तो हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत होता. कोरोना काळात पॅरोलवर सुटल्यानंतर त्याने निराला बाजार येथील हॉटेलमध्ये काम सुरु केले होते. दलालवाडीत त्याला भाड्याने घर देताना किंवा हॉटेलमालकाने नोकरी देताना त्याला कुठलीच माहिती विचारण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याची पुन्हा एकदा विकृत प्रकार करण्याची हिंमत झाली.

इतर बातम्या-

जिल्हा परिषदेची सदस्य संख्या वाढणार, ओमिक्रॉन रोखण्यासाठी विशेष प्लान; मंत्रिमंडळ बैठकीतील चार मोठे निर्णय

वेडाच्या भरात कुऱ्हाडीने अंदाधुंद हल्ला, दोन मुली, सख्खा भाऊ ठार, पोलीस निरीक्षक-रिक्षा चालकालाही संपवलं


Published On - 3:41 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI