Omicron : ओमिक्रोन जोरदार वेगानं हातपाय पसरतोय, आतापर्यंत जवळपास दीड डझन देशात ओमिक्रोनचा प्रसार

सुरवातील एका देशात आढळून आलेला हा विषाणू  आता अर्ध जग व्यापल्याचं दिसून येतंय. त्यामुळे ही नवी यादी अनेक देशांची झोप उडवली आहे. अनेक देशांनी दक्षिण अफ्रित हा विषाणू आढळल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घातली होती. तरीही या विषाणुचा प्रसार रोखता आला नाही, या वाढलेल्या यादीवरून त्याच्या प्रसाराच्या वेगाचा अंदाज येतो.

Omicron : ओमिक्रोन जोरदार वेगानं हातपाय पसरतोय, आतापर्यंत जवळपास दीड डझन देशात ओमिक्रोनचा प्रसार

ओमिक्रोननं पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली असताना ओमिक्रोनचा प्रसार अत्यंत वेगानं होत असल्याचं समोर आलंय. नव्यानं ओमिक्रोन आढळलेल्या देशाची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत जवळपास दीड डझन देशात ओमिक्रोनच्या नव्या विषाणुचा प्रसार झालाय. सुरूवातीला फक्त दक्षिण अफ्रिकेत आढळेला ओमिक्रोन आता 16 देशात आढळून आल्याची नवी यादी समोर आली आहे.

आतापर्यंत या देशात आढळला ओमिक्रोन

 1. ऑस्टेलिया
 2. ऑस्ट्रिया
 3. बेल्जियम
 4. बोत्सवाना
 5. कॅनडा
 6. डेन्मार्क
 7. फ्रान्स
 8. जर्मनी
 9. हाँग काँग
 10. इस्त्राईल
 11. इटली
 12. नेदरलँड
 13. पोर्तुगाल
 14. दक्षिण अफ्रिका
 15. स्वित्झरलँड
 16. ब्रिटन

आणखी वेगान प्रसार होण्याची शक्यता

सुरवातील एका देशात आढळून आलेला हा विषाणू  आता अर्ध जग व्यापल्याचं दिसून येतंय. त्यामुळे ही नव्या यादीने अनेक देशांची झोप उडवली आहे. अनेक देशांनी दक्षिण अफ्रिकेत हा विषाणू आढळल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घातली होती. तरीही या विषाणुचा प्रसार रोखता आला नाही, या वाढलेल्या यादीवरून त्याच्या प्रसाराच्या वेगाचा अंदाज येतो. उद्यापर्यंत ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण या देशामधून आतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जगावर पुन्हा एकदा मोठं संकट आलंय.

भारतात, महाराष्ट्रात नियम कडक होण्याची शक्यता

देशात आणि राज्यात संभाव्य धोका ओळखून निर्बंध लागले आहेत. ते निर्बंध  या नव्या यादीनंतर आणखी कडक केले जाऊ शकतात. राज्य सरकारही अलर्ट मोडवर आलं आहे. मुख्यमंत्री अधिकारी आणि नेत्यांसोबत बैठका घेऊन काय उपययोजना करता येतील याचा आढावा घेत आहेत. त्याचबरोबर जे जे आवश्यक आहे ते करा असे आदेशही मुख्यमंत्री प्रशासनाला दिले आहेत.

धुळ्यात पाहुण्या पक्ष्यांचे आगमन; नदी, तलावासह पाणथळे फुलले

कुख्यात गँगस्टर अमित भोगलेला बेड्या, दोन देशी पिस्तूल, 8 जिवंत काडतुसे, शस्त्र जप्त, मुंबई पोलिसांची कारवाई!

कोरोनानंतर तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर “ढोलकीवर थाप, अन घुंगरांचा आवाज अन ललनांच्या दिलखेचक अदानी रंगला तमाशाचा फड

Published On - 6:33 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI