AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये खळबळ, अजित पवार यांनी अचानक घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट धारूरनंतर…

माजलगाव, धारूर येथील सभा संपल्यानंतर अजित पवारांचा ताफा हेलिपॅडकडे न जाता थेट दुसरीकडे गेल्याने मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांनी अचानक निर्णय घेतला. अजित पवार हे बीडचे पालकमंत्री असून प्रचारानिमित्त ते बीडमध्ये होते.

बीडमध्ये खळबळ, अजित पवार यांनी अचानक घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट धारूरनंतर...
Ajit Pawar
| Updated on: Nov 29, 2025 | 4:49 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक मस्साजोगच्या दिशेने रवाना झाले. आज संतोष देशमुख यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. कोणताही नियोजित दाैरा अजित पवार यांचा नव्हता. यादरम्यान अजित पवारांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी संवाद साधला. माजलगाव, धारूर येथील सभा संपल्यानंतर अजित पवारांचा ताफा हेलिपॅडकडे न जाता मस्साजोगच्या दिशेने रवाना झाला. धारूरनंतर ते बीडकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र अचानक मस्साजोगच्या दिशेने रवाना झाले आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेची देखील धावपळ उडाली. कोणाला काहीही माहिती नसल्याने यंत्रणेची धावपळ उडाली. संतोष देशमुख यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मस्साजोगकडे सकाळपासूनच लोक जात आहेत. त्यामध्येच अजित पवार हे बीडमध्येच होते आणि अचानक त्यांनी मस्साजोगकडे जाण्याचा निर्णय घेतला.

अजित पवार यांनी काही वेळ संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि त्यांचा भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आले. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावरही काही आरोप झाली. या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाचे वातावरण बघायला मिळाले. अनेक मोर्चे काढली गेली.

हेच नाही तर जवळपास सर्वच नेत्यांनी मस्साजोगला जात भेट घेतली. संतोष देशमुखांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले. अजित पवारांनी या प्रकरणात सुरूवातीला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नव्हता. त्यानंतर अचानक धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांच्याकडून परळी नगरपरिषद निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जात आहे. अजित पवार बराचवेळ कुटुंबियांशी संवाद साधताना दिसले.

आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने म्हटले. यावेळी अजित पवार यांच्यासोबत नवाब मलिक हे देखील उपस्थित होते. धनंजय मुंडे यांना देखील सहआरोपी संतोष देशमुख प्रकरणात करावे, असे थेट मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वीच म्हटले होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...