AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटानं भाजपचं टेन्शन वाढवलं, थेट मोठी घोषणा

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, दरम्यान निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे, अजित पवार गटाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटानं भाजपचं टेन्शन वाढवलं, थेट मोठी घोषणा
अजित पवार Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2025 | 6:55 PM
Share

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आता प्रचार रंगात आला आहे, दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर राज्यात लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.  त्यानंतर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर होऊ शकतो. आता महापालिका निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि  विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले बनसोडे? 

राष्ट्रवादी अजित पवार गट सोलापूर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे.  आमच्या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने आगामी सोलापूर शहरातील सर्व 26 प्रभागात आणि 102 जागा आम्ही स्वबळावर  लढवणार आहोत. यामध्ये किमान 75 जागा जिंकून सत्तेत येऊ, अशा विश्वास यावेळी बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

भाजप सत्तेत असतानासुद्धा सोलापूर शहराचा मागील पाच वर्षात अपेक्षित असा विकास झालेला नाही. रस्ते, झोपडपट्टीचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. भाजपात जसे इनकमिंग सुरू आहे, तसेच राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे सध्या सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक आहेत. आगामी निवडणुकीत ती संख्या 75 वर गेलेली दिसेल, आम्ही सोलापूरसाठी ‘अब की बार 75 पार’चा दिलेला नारा यशस्वी करण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करणार आहोत. सोलापुरात एमआयएम पक्षाचे एकूण 9 नगरसेवक होते. त्यापैकी 6 नगरसेवक ऑलरेडी अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षात आलेले आहेत.  उर्वरित 3 जणांबरोबर बोलणे सुरू आहे.  लवकरच ते तीनही माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येतील, असंही यावेळी बनसोडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यामुळे सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणुकीत कोणाचे आव्हान असेल असं मला वाटत नाही, आम्ही पिंपरी चिंचवड शहराच्या धरतीवर सोलापूर शहराचा विकास करू, असं बनसोडे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन.

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर.

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर