AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्सीडेंटल सीएम…, कोण होणार होतं मुख्यमंत्री? उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी जालन्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे, देवेंद्र फडणवीस हे अ‍ॅक्सीडेंटल सीएम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्सीडेंटल सीएम..., कोण होणार होतं मुख्यमंत्री?  उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 08, 2025 | 3:48 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी जालन्यात त्यांची पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट देखील केला, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस हे अ‍ॅक्सीडेंटल मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपावर टीका करताना ही भ्रष्टाचारी जनता पार्टी आहे, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे, ते दाखवण्यासाठी माझा हा दौरा आहे, कोकणात मी बैठक घेणार आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

शेतकऱ्यांच्या पिकाला हमिभाव मिळाला पाहिजे, आत्ताच ती वेळ आहे सातबारा कोरा करायची, संपूर्ण जमीन खरडून गेली आहे. यावर्षी पाऊस आधी सुरू झाला, मी अनेक शेतकऱ्यांना भेटलो, ज्या शेतकऱ्यांचं वय 90 पेक्षा जास्त आहे, त्यांनाही भेटलो त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मराठवाडा आवर्षग्रस्त भाग आहे, मात्र यंदा अति पाऊस झाला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, लोकांचं आयुष्य पाण्यात वाहून गेलं. सरकार आल्यानंतर सातबारा कोरा करणार असं म्हटले होते पण तसं झालं नाही, आता सातबारा कोरा करण्याची योग्य वेळ आहे. केंद्रीय पथक कधी आलं अन् गेलं कधी हेच कळलं नाही, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.  देवेंद्र फडणवीस हे  अ‍ॅक्सीडेंटल मुख्यमंत्री आहेत,  नाहीतर ते दाढी वाल्यालाच (एकनाथ शिंदे) यांना मुख्यमंत्री करणार होते. असा गौप्यस्फोट यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गौप्यस्फोटामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

पार्थ पवार प्रकरणावर प्रतिक्रिया

पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप  झाला आहे, यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मुरलीधर मोहोळ यांचा भ्रष्टाचार दाबला गेला. अंबादास दानवे यांनी अनेक भ्रष्टाचार बाहेर काढले आहेत.  भाजप भ्रष्टाचार करणाऱ्यांना अभय देत आहे,  जे काही होणार आहे ते जगजाहीर होणार आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...