मोदी-फडणवीसांसह भाजप नेत्यांचं बाळासाहेबांना अभिवादन, अजित पवारही शिवतीर्थावर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊन सकाळी आठ वाजताच मानवंदना दिली.

Balasaheb Thackeray Birth Anniversary, मोदी-फडणवीसांसह भाजप नेत्यांचं बाळासाहेबांना अभिवादन, अजित पवारही शिवतीर्थावर

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray Birth Anniversary) शिवसेनेने वचनपूर्ती सोहळ्याचं आयोजन केलं आहे. तर शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतरही भाजप नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहण्याची परंपरा सोडलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांनी ट्विटरवरुन बाळासाहेबांना अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊन सकाळी आठ वाजताच मानवंदना दिली.

‘कठोर अन् प्रेमळ… प्रेरणादायी अन् उर्जावान… हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सदैव मार्गदर्शन करीत राहतील…’ असं ट्वीट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ‘महाराष्ट्राचं वैभव, ज्वलंत विचारांचा ‘मार्मिक’ ठेवा, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन…!’ असं दुसरं ट्वीटही पाठोपाठ फडणवीसांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्रजीतून ट्वीट करत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं ट्वीट

महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही बाळासाहेबांना अभिवादन

मुंडे आणि ठाकरे कुटुंबाची वर्षानुवर्षांची जवळीक आहे. माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहीण मानतात. पंकजा मुंडे यांनी बाळासाहेबांना ट्विटरवरुन अभिवादन केलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बाळासाहेबांना ट्विटरवरुन मानवंदना

माजी विरोधीपक्ष नेते आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची आदरांजली

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून अभिवादन

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे बाळासाहेबांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनीही बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मंत्री जयंत पाटील यांच्याकडून बाळासाहेबांना वंदन

शिवसेना मंत्री सुभाष देसाई यांची मानवंदना

Balasaheb Thackeray Birth Anniversary

संबंधित बातम्या :

ठाकरे vs ठाकरे, बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *