नागपुरातील हनीट्रॅप प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करा, फडणवीसांचं गृहमंत्र्यांना पत्र

सोशल मीडियावर सध्या फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचादेखील उल्लेख आहे (Devendra Fadnavis Letter to Anil Deshmukh on Nagpur honey trap case).

नागपुरातील हनीट्रॅप प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करा, फडणवीसांचं गृहमंत्र्यांना पत्र

नागपूर : सोशल मीडियावर सध्या फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नागपूर महापालिकेचे महापौर संदीप जोशी आणि भाजप नगरसेवक दयाशंकर यांना हनीट्रॅप करण्याबाबत गुन्हेगारी कटकारस्थानाचा उल्लेख आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवले आहे (Devendra Fadnavis Letter to Anil Deshmukh on Nagpur honey trap case).

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचादेखील उल्लेख आहे. अनिल देशमुख यांच्या आशीर्वादानेच गुन्हेगारांना अभय दिले जात असल्याचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये आहे. त्याचबरोबर न्यायव्यवस्था मॅनेज करण्याबाबतही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या ऑडिओ क्लिपची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“कथित ऑडिओ क्लिपमध्ये गंभीर उल्लेख असल्याने याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन त्यातील सत्य जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. याप्रकरणी आपण उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्याल, असा विश्वास आहे”, असं देवेंद्र फडणवीस अनिल देशमुख यांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले (Devendra Fadnavis Letter to Anil Deshmukh on Nagpur honey trap case)..

दरम्यान, या कथित ऑडिओक्लिप प्रकरणी लवकरात लवकर चौकशी केली जाईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली. “या प्रकरणात कुणालाही अडकवण्याचा प्रयत्न नाही. नागपुरात प्रशाकीय अधिकारी आणि राजकारणी यांच्यात वादाची किनार आहे. या प्रकरणाती निश्चित चौकशी करु. मी ती क्लिप ऐकली आहे. त्यामुळे लवकर चौकशी केली जाईल”, अशी ग्वाही अनिल देशमुख यांनी दिली.

हेही वाचा : खोट्या प्रमाणपत्रांनी प्लाझ्मा थेरपी, गरजूंची फसवणूक, गृहमंत्र्यांकडून कडक कारवाईचा इशारा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *