खोट्या प्रमाणपत्रांनी प्लाझ्मा थेरपी, गरजूंची फसवणूक, गृहमंत्र्यांकडून कडक कारवाईचा इशारा

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी ही उपयुक्त ठरत (Anil Deshmukh talk on Plasma) आहे.

खोट्या प्रमाणपत्रांनी प्लाझ्मा थेरपी, गरजूंची फसवणूक, गृहमंत्र्यांकडून कडक कारवाईचा इशारा

मुंबई : “कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी ही उपयुक्त ठरत (Anil Deshmukh talk on Plasma) आहे. परंतु या संदर्भात फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यापासून सावध राहावे”, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले (Anil Deshmukh talk on Plasma) आहे. दरम्यान, जर कुणी गरजूंची फसवणूक करत असेल तर अशांंवर कडक कारवाईचा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.

अनिल देशमुख म्हणाले, “प्लाझ्मा दान करण्यासाठी कोविडमधून बरे झाल्याचा वैद्यकीय अहवाल आणि प्लाझ्मा दान करण्यास तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. गरजू लोकांच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेत त्यांना फसवण्याचा उद्देशाने बनावट प्रमाणपत्र देखील तयार केली जात आहेत. ही खोटी प्रमाणपत्रे दाखवून लाखो रुपये गरजू रुग्णांकडून घेतले जाऊ शकतात”

“डॉक्टरांच्या मते आणि निरीक्षणावरून ‘प्लाझ्मा थेरपी’ कोविड -1 रूग्णांसाठी एक उपचार पद्धती म्हणून उदयास आली आहे. जास्तीत जास्त कोविड रूग्णांना मदत करण्यासाठी विविध राज्य आणि रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा देणगी(डोनेशन) मोहीम सुरू केली आहे. प्लाझ्मा देणगीदाराच्या कमतरतेमुळे ही थेरपी महाग आहे. काही निवडक रुग्णालयात ही उपचार पद्धती करण्यात येते. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, कोरोनातून बरे झालेले बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार थेट लोकांना प्लाझ्मा दान देताना आढळून आले आहेत.”, असं अनिल देशमुख यांनी सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“सायबर गुन्हेगार यासाठी समाज माध्यमांवर विविध युक्त्या देखील वापरत आहेत. डार्क वेब आणि बेकायदेशीर वाहिन्यांवर प्लाझ्माच्या विक्री संदर्भात फसवणूक होऊ शकते. त्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईलच. तथापि सर्व संबंधित लोकांनी या प्लाझ्मा थेरपी उपचाराबाबत जागरूक रहावे. सावध असावे. प्लाझ्मा दाता ऑनलाईन शोधताना काळजी घ्यावी”, असं अनिल देशमुख यांनी सांगितले.

“नागरिकांनी कोणत्याही कोविड उपचाराच्या सुरक्षित पद्धतींवरच अवलंबून असले पाहिजे. जर या संदर्भात काही फसवणूक होत असेल तर कृपया आपल्या नजीकच्या पोलिस स्टेशनला कळवा. तसेच www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी”, असं आवाहनही देशमुख यांनी केले.

संबंधित बातम्या :

कोरोनामुक्त झालेल्या पोलीस, डॉक्टरांकडून प्लाझ्मा दान, कोरोना योद्धांचे सामाजिक भान

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार : अनिल देशमुख

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *