AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भेगाळलेले पाय आणि घायाळ मन..धनंजय मुंडेंच्या जीम मधल्या व्हिडिओची चर्चा

आमदार धनंजय मुंडे यांनी पुन्हा कमबॅक करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी व्हिडिओ पोस्ट कमबॅक करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच ते आरोग्यावर लक्ष देत असल्याचे मुंडे यांनी अप्रत्यक्षरिता सांगितले.

भेगाळलेले पाय आणि घायाळ मन..धनंजय मुंडेंच्या जीम मधल्या व्हिडिओची चर्चा
dhananjay munde Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 07, 2026 | 10:49 AM
Share

राज्याच्या राजकारणात पुन्हा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत. धनंजय मुंडे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत राज्याच्या राजकारणात पुन्हा कमबॅक करणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या संकेत दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी एक व्हिडिओ शेअर करत आरोग्याची विशेष काळजी घेत असल्याचे दर्शवले आहे. मुंडे यांनी व्हिडिओसोबत एक कविता देखील शेअर केली आहे. ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे’ अशा आशयाची ओळी पोस्टमधील कवितेत आहेत. त्यांचा या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जिम लावल्याचे भाष्य केले होते. मुंडे यांनी एका जाहीर सभेत जीम लावल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी कमबॅक करणार असल्याचे संकेत दिले होते. मुंडे यांनी आरोग्याची काळजी घेत सांगितले होते. परंतु मुंडे यांच्या त्या जाहीर सभेतील आक्रमक भाषणामुळे राजकारणात पुन्हा कमबॅक करणार असल्याची जोरदार सुरू झाली होती. परंतु त्यांनी आरोग्यावर लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळीच जीम लावल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता त्यांचा जीममधील व्हिडिओ समोर आला आहे.

धनंजय मुंडे यांनी एक कविता व्हिडिओसोबत शेअर केली आहे. ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे. भेगाळलेले पाय आणि घायाळ मन; अजूनही धैर्य टिकवून आहे. निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे. हरवण्याची आता बिशाद कुणाची…स्वतःशी सुद्धा लढतो आहे, अशा आशयाची कविता मुंडे यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे व्यायाम करताना दिसत आहेत.

दरम्यान, बीडमधील संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी वैयक्तिक कारण देत मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. मागील काही दिवसांपासून विविध व्याधींना सामोरे जात असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे. खरंतर एका प्रकरणामुळे बीडच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या धनंजय मुंडे यांना बॅकफुटवर यायला लागलं. त्यांच्या हातातून पालकमंत्री देखील गेलं. त्यामुळे तेव्हापासून धनंजय मुंडे बीडसह राज्याच्या राजकारणात धडकण्यासाठी तयारी करत असल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांत पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती. परंतु कोणीही याबाबत अधिकृत दुजोरा दिला नाही. त्यानंतर आता त्यांचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Follow Us
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल