केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय लसींचे वितरण, राजेश टोपे यांची माहिती

मुंबईसाठी 1 लाख 39 हजार 500 तर पुण्यासाठी 1 लाख 13 हजार डोसेस वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय लसींचे वितरण, राजेश टोपे यांची माहिती
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 8:09 PM

मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींची पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लसींचे वाटप केले जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या सुधारित केली असून आता 358 केंद्रांच्या माध्यमातून लस देण्यात येणार आहे. राज्यात सर्वाधिक केंद्र मुंबईत (50) असून त्या पाठोपाठ पुणे (39) ठाणे (29) या शहरांमध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. मुंबईसाठी 1 लाख 39 हजार 500 तर पुण्यासाठी 1 लाख 13 हजार डोसेस वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Distribution of district wise vaccines as per instructions of Central Government information of Rajesh Tope)

महाराष्ट्रात सुमारे 8 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. राज्यातील 358 केंद्रांच्या माध्यमातून पहिल्या दिवशी सुमारे 35 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल. 16 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार असून जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईतील कुपर रुग्णालय या दोन ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान संवाद साधतील, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला कोरोना लसींचे वाटप केले जात असून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात 9 लाख 63 हजार लसींचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात 9 हजार डोस, अमरावतीसाठी 17 हजार, औरंगाबाद-34 हजार, बीड-18 हजार, बुलढाणा-19 हजार, धुळे-12 हजार 500, गडचिरोली 12 हजार, गोंदिया 10 हजार, हिंगाली 6 हजार 500, जळगाव-24 हजार 500, लातूर-21 हजार, नागपूर-42 हजार, नांदेड-17 हजार, नंदुरबार-12 हजार 500, नाशिक-43 हजार 500, मुंबई-1 लाख 39 हजार 500, उस्मानाबाद-10 हजार, परभणी-9 हजार 500, पुणे-1 लाख 13 हजार, रत्नागिरी-16 हजार, सांगली-32 हजार, सातारा-30 हजार, सिंधुदुर्ग-10 हजार 500, सोलापूर-34 हजार, वर्धा-20 हजार 500, यवतमाळ-18 हजार 500, अहमदनगर-39 हजार, भंडारा-9 हजार 500, चंद्रपूर-20 हजार, जालना-14 हजार 500, कोल्हापूर-37 हजार 500, पालघर-19 हजार 500, रायगड-9 हजार 500, ठाणे-74 हजार, वाशिम-6 हजार 500 अशा प्रकारे वाटप करण्यात आले आहे.

सुधारित लसीकरण केंद्रांची संख्या खालीलप्रमाणे

अहमदनगर-15, अकोला-4, अमरावती-6, औरंगाबाद-13, बीड-6, भंडारा-4, बुलढाणा-7, चंद्रपूर-8, धुळे-5, गडचिरोली-5, गोंदिया-4, हिंगोली-3, जळगाव-9, जालना-6, कोल्हापूर-14, लातूर-8, मुंबई-50, नागपूर-15, नांदेड-6, नंदुरबार-5, नाशिक-16, उस्मानाबाद-4, पालघर-6, परभणी-4, पुणे-39, रायगड-5, रत्नागिरी-6, सांगली-12, सातारा-11, सिंधुदुर्ग-4, सोलापूर-13, ठाणे-29, वर्धा-8, वाशिम-4, यवतमाळ-6 असे एकूण 358 केंद्र करण्यात आली आहेत. (Distribution of district wise vaccines as per instructions of Central Government information of Rajesh Tope)

संबंधित बातम्या – 

Covid vaccine ! कलियुगातील संजीवनी मुंबईत आली; कोरोना लसीच्या वितरणासाठी BMC सज्ज: महापौर

Covid vaccine : कोरोनाच्या लसीमुळे कोणते साईड इफेक्टस शक्य; राजेश टोपेंकडून महत्त्वाची माहिती

(Distribution of district wise vaccines as per instructions of Central Government information of Rajesh Tope)

Non Stop LIVE Update
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.