AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covid vaccine ! कलियुगातील संजीवनी मुंबईत आली; कोरोना लसीच्या वितरणासाठी BMC सज्ज: महापौर

मुंबईतही कोरोनाची लस दाखल झाली असून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यावर समाधान व्यक्त केलं आहे. (1st batch of Covaxin reaches mumbai says kishori pednekar)

Covid vaccine ! कलियुगातील संजीवनी मुंबईत आली; कोरोना लसीच्या वितरणासाठी BMC सज्ज: महापौर
किशोरी पेडणेकर, महापौर
| Updated on: Jan 13, 2021 | 1:32 PM
Share

मुंबई: मुंबईतही कोरोनाची लस दाखल झाली असून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यावर समाधान व्यक्त केलं आहे. कलियुगातील संजीवनी मुंबईत आली आहे. आता घाबरून जायचं कारण नाही. काळजी करू नका, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. (1st batch of Covaxin reaches mumbai says kishori pednekar)

मुंबईत सीरमची लस आल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही9 मराठीकडे सर्वात आधी प्रतिक्रिया व्यक्त केली. आता घाबरू नका. काळजी करण्याचं काम नाही. मुंबईत कलियुगातील संजीवनी आली आहे. त्यामुळे कोरोनाचा खात्मा होणार असून मुंबईकरांना मोठी संजीवनी मिळणार आहे, असं पेडणेकर यांनी सांगितलं. मुंबईत एकूण 1,39,500 लस आल्या आहेत. मुंबईत एकूण 1 लाख 30 हजार आरोग्य सेवकांची नोंदणी झाली आहे. मुंबईत 9 ठिकाणी लसीकरण केंद्र सज्ज करण्यात आले आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने आधीपासूनच तयारी केली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबईत आज आलेली कोरोना लस मुंबईत परळच्या कोल्ड स्टोअरमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर इतर 9 केंद्रावर ही लस पाठवली जाईल, असं त्यांनी सांगितलं. कोरोना लसबाबत लोकांमध्ये काही प्रमाणात गैरसमज निर्माण झाल्याचं ऐकून आहे. काही लोक गैरसमज पसरवत असून हे योग्य नाही. लोकांनी या लसीबाबत गैरसमज पसरवू नये. तसेच नागरिकांनीही अशा अफवांना बळी पडून घाबरून जावू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

50 लाख लस स्टोअर करण्याची क्षमता

मुंबईत निश्चित केलेल्या रुग्णालयांमध्ये 10 लाख लस स्टोअर करण्याची क्षमता आहे. या ठिकाणी -25 ते -15 डिग्री तापमानची सुविधा करण्यात आली आहे. तसेच लसीचे स्टोरेज करण्यासाठी कांजूरमार्ग येथे मुबलक जागा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी 50 लाखांहून अधिक लस स्टोअर करता येऊ शकतील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.

कोरोनाची लस आल्यानंतर 24 तासात आपल्याला पहिल्या टप्प्यातील लोकांना लस देता येईल. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 8 सेंटर तयार आहेत. उद्यापर्यंत आणखी 8 सेंटर तयार होतील. तसेच घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय हे दोन सेंटरमध्ये काम करेल. त्यामुळे अशाप्रकारे आपले 16 सेंटर तयार होतील. दरम्यान मुंबईत जवळपास 50 सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. हे प्रत्येक सेंटर 2 शिफ़्टमध्ये काम करणार आहे.

बेड आणि स्टाफ

मुंबईतील कोव्हिड सेंटरमध्ये सद्यस्थितीत 75 टक्के बेड शिल्लक आहेत. तसेच या ठिकाणी ऑक्सिजन सिस्टम देखील सज्ज आहे. रुग्ण वाढले तरी मुंबई सज्ज आहे. आपल्याकडे मुबलक स्टाफ उपलब्ध आहे.

तसेच ब्रिटनमधून नवा कोरोनाचा रुग्ण आला तरी त्यासाठी देखील पालिकेने तयारी केली आहे. सध्या 7 हजार रुग्ण आहेत. बेड रिकामे असले तरी आपण स्टाफला कायम ठेवलं आहे. कारण त्या स्टाफची आपल्याला केव्हाही गरज पडू शकते.

सर्वप्रथम लस कोणाला मिळणार?

शासकीय कर्मचारी : परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय, तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, सफाई कामगार या कोरोना लढ्यात थेट सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

खासगी कर्मचारी : रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कोरोना लढ्यात थेट सहभाग आला आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती, संपर्क क्रमांक महापालिकेने घेतले आहेत. (1st batch of Covaxin reaches mumbai says kishori pednekar)

संबंधित बातम्या:

मुंबईतील कोरोना लसींच्या स्टोरेज रुमची महापौरांकडून पाहणी, वैशिष्ट्य काय?

मुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार

Covid vaccine : कोरोनाच्या लसीमुळे कोणते साईड इफेक्टस शक्य; राजेश टोपेंकडून महत्त्वाची माहिती

(1st batch of Covaxin reaches mumbai says kishori pednekar)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.