वाढवण समुद्राच्या किनारी डॉल्फीन पाण्याबाहेर आले, पाहण्यासाठी एकच गर्दी…video
गुजरातला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरात अनोखी घटना घडली आहे. येथे समुद्रातून डॉल्फीन मासे किनाऱ्यावर वाहून आल्याने बघ्यांची एकच गर्दी जमली होती. या माशांच्या उपस्थितीमुळे हा समुद्र किनारा स्वच्छ असल्याचे म्हटले जात आहे.

वाढवण समुद्राच्या किनारी दोन डॉल्फीन मासे पाण्याबाहेर आल्याची अनोखी घटना घडली आहे. या डॉल्फीन माशांना पाहण्यासाठी समुद्र किनारी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या माशांना समुद्राच्या किनाऱ्यावर पहुडलेले पाहून काही जागरुक नागरिकांनी याची माहिती वनविभाग आणि रेक्स्यू टीमला दिली. त्यामुळे या अनोख्या पाहुण्यांचे प्राण वाचवण्यात यश मिळालेले आहे.
समुद्रात डॉल्फीन दिसण्याच्या घटना एरव्ही कोकणातील रत्नागिरी, मालवलच्या समुद्रात घडत असतात आता पालघरच्या गुजरातला लागून असलेल्या वाढवण बंदरात डॉल्फीनची उपस्थिती नोंदविली गेल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. डॉल्फीन दिसल्याने हा सुमद्र बऱ्यापैकी स्वच्छ असल्याचे मानले जात आहे.आता वाढवण येथे मोठे बंदर विकसित केले जाणार असल्याने ही नैसर्गिक साधन संपत्ती गमावण्याची भीती देखील पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वाढवण समुद्रात अनेक दुर्मिळ मासे पाहायला मिळत असतात. येथील मच्छीमारांना या नैसर्गिक साधन संपत्तीचा मोठा फायदा होत असतो.
येथे पाहा व्हिडीओ –
पालघरच्या वाढवण समुद्रकिनारी दोन डॉल्फिन वाहून बाहेर आल्याने त्यांना पाहण्यासाठी समुद्रकिनारी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्यासोबत हे दोन्ही डॉल्फिन किनाऱ्याच्या दिशेने आल्याची माहिती. दरम्यान, ही माहिती मिळताच स्थानिक नागरिक, वनविभाग आणि वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमने तातडीने मदतकार्य सुरू केले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून दोन्ही डॉल्फिनना सुखरूप पुन्हा खोल समुद्रात सोडण्यात यश आल आहे. त्यामुळे डॉल्फिनना जीवदान मिळाले असून, वनविभाग आणि रेस्क्यू टीमच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.