AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! Blinkit ॲप तुमची माहिती चोरतंय? ॲपवर हेरगिरीचे गंभीर आरोप, कंपनीने दिलं स्पष्टीकरण!

Blinkit तुमच्या फोनमधील ॲप्सवर, तुमचे वाय-फाय, बॅटरी आणि लोकेशनवर लक्ष ठेवते का? एका कंटेंट क्रिएटरने हा दावा केला आहे. यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

सावधान! Blinkit ॲप तुमची माहिती चोरतंय? ॲपवर हेरगिरीचे गंभीर आरोप, कंपनीने दिलं स्पष्टीकरण!
Does Blinkit Track Your Phone Apps
| Updated on: Nov 28, 2026 | 12:19 PM
Share

Blinkit वर लास्ट मिनिटाला शॉपिंग करणे हे फारच कॉमन झालं आहे. घरात काहीही संपलं की आपला हात आपसूकच Blinkit या ॲपकडे जातो. किराणा माल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू यावर सहज मिळतात. परंतु, हेच ॲप तुमच्या फोनवरील महत्त्वाची माहिती सेव्ह करतेय का? फोनवरील संवेदनशील आणि खाजगी माहितीवरही लक्ष ठेवत असू शकते का? याबद्दलचे प्रश्न एका कंटेंट क्रिएटरने उपस्थित केले आहेत. एका कंटेंट क्रिएटरने असा दावा केला आहे की, ॲपचा कोड तपासला असता त्यांना असे आढळले की, हे ॲप युजर्सच्या फोनमधील विविध प्रकारच्या डेटामध्ये प्रवेश करते. इन्स्टाग्रामवर ॲप्स कसे काम करतात हे सोप्या भाषेत समजावून सांगत अनिका बेरी हिने या विषयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

काय माहिती मिळाली व्हिडीओमधून?

अनिका बेरीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात तिने अनेक माहिती शेअर केली आहे. तिने स्पष्ट केले की, Blinkit ॲपचे ‘रिव्हर्स-इंजिनिअरिंग’ करून अशा काही गोष्टी समजल्या, ज्यांची सामान्य युजर्सला कदाचित कल्पनाही नसेल. तिच्या म्हणण्यानुसार, हे ॲप फोनवर इन्स्टॉल केलेले इतर ॲप्लिकेशन्स, वाय-फाय नेटवर्कची नावे, लोकेशन, बॅटरीची स्थिती आणि काही ‘ॲक्सेसिबिलिटी’ सेटिंग्ज यांसारखी माहिती तपासू शकते. अनिकाचा असा दावा आहे की, या डेटाचा वापर करून वापरकर्त्याचे वय, त्यांच्या घरात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या आणि ऑर्डर देताना ते किती घाईत आहेत, याचाही अंदाज लावला जाऊ शकतो.

तुमच्या फोनवर इंस्टाग्राम, झोमॅटो किंवा ब्लिंकिट यांसारखी ॲप्स आहेत का?

अनिका बेरीने आपल्या व्हिडिओमध्ये दावा केला की, Blinkit चे अ‍ॅप फोनमधील जवळपास 21 अ‍ॅप्लिकेशन्सची उपस्थिती तपासते. यामध्ये Instagram, Zomato यांसारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचाही समावेश असल्याचे त्याने सांगितले. फोनमध्ये कोणती अ‍ॅप्स इन्स्टॉल आहेत, यावरून वापरकर्त्यांच्या आवडीनिवडींचा अंदाज घेऊन त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती दाखवल्या जाऊ शकतात, असा मुद्दाही त्याने उपस्थित केला. इतकेच नाही, तर फोनमधील फॉन्टचा आकार, स्क्रीन झूम आणि स्क्रीन रीडर यांसारख्या सेटिंग्जचीही माहिती अ‍ॅप घेत असल्याचा तिचा दावा आहे. या माहितीच्या आधारे वापरकर्त्याचे वय, त्याच्या सवयी आणि गरजा याचा अंदाज बांधणे शक्य असल्याचे त्याने म्हटले. याशिवाय, Blinkit एका विशिष्ट फाइलचा बॅकअप ठेवते, ज्यामुळे नवीन फोनवर OTP न टाकताही लॉगिन करता येऊ शकते, असा दावाही व्हिडिओमध्ये करण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by Anika Beri (@berispills)

Blinkit ने काय स्पष्टीकरण दिले?

या व्हिडीओची चर्चा सुरू झाल्यानंतर Blinkit च्या Android टीमने कंपनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपली बाजू मांडली. व्हिडीओमध्ये नमूद केलेल्या बहुतांश गोष्टींचा वापर मार्केटिंग किंवा युजर्सवर नजर ठेवण्यासाठी केला जात नसून, अ‍ॅपचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी केला जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Zomato आणि District यांसारख्या Eternal समूहातील अ‍ॅप्स फोनमध्ये आहेत का, हे तपासण्यामागे विशिष्ट तांत्रिक कारणे आहेत. उदाहरणार्थ, ‘Login with Zomato’ सारखी सुविधा योग्य पद्धतीने काम करण्यासाठी ही माहिती उपयोगी ठरते. त्याचप्रमाणे, WhatsApp च्या माध्यमातून रेसिपी शेअर करणे आणि त्या रेसिपीसाठी लागणाऱ्या वस्तूंची थेट कार्ट तयार करणे अशा सुविधांसाठीही संबंधित अ‍ॅप्सची उपलब्धता तपासली जाते. इन्स्टाग्रामचा वापर वर्षभरातील आठवणींचा रिकॅप स्टोरीच्या स्वरूपात शेअर करण्यासाठी केला जातो, असेही कंपनीने सांगितले.

फॉन्ट साइज, स्क्रीन झूम आणि स्क्रीन रीडर यांसारख्या सेटिंग्जचा वापर अ‍ॅप अधिक सुलभ बनवण्यासाठी केला जातो. विशेषतः दिव्यांग व्यक्ती आणि वेगवेगळ्या गरजा असलेल्या वापरकर्त्यांना अ‍ॅप वापरणे सोपे व्हावे, हा त्यामागचा उद्देश असल्याचे Blinkit ने स्पष्ट केले.

Follow Us
बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
Harshwardhan Sapkal On Sharad Pawar : बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वे
Mumbai Megablock Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक
महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत....
Pune Police : महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत प्रसिद्धीपत्रकातील चुकीने उडाली खळबळ
डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले, म्हणाले....
Sanjay Raut : सत्तेच्या लालसेपोटी विचारांची माती केली...; डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले
जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा जाहीर केला, पण लंके म्हणाले... आधी....
Nilesh Lanke : Delimitation Bill : जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा जाहीर केला, पण लंके म्हणाले... आधी विधेयकाचा मसुदा वाचणार
मविआत ठिणगी, आघाडीत मोठी फूट? पवारांच्या भूमिकेवर अंधारे संतापल्या....
Sushma Andhare : मविआत ठिणगी, आघाडीत मोठी फूट? शरद पवारांच्या भूमिकेवर सुषमा अंधारे संतापल्या, म्हणाल्या...
शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा... वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला
Vijay Wadettiwar : शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा... विजय वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला; डिलिमिटेशन विधेयकावरूनही राष्ट्रवादीला सुनावलं
देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? डिलिमिटेशन बिलात काय आहे?
Delimitation Bill : देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? लोकसभेच्या जागा वाढणार, महिलांना आरक्षण मिळणार; डिलिमिटेशन बिलात काय आहे?
त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख
Rohit Pawar : त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे?
विधेयकामुळे महाराष्ट्राचा आणि दक्षिणेचा पीएम कधीच होणार नाही- सामना
Saamana On Delimitation Bill : विधेयकामुळे महाराष्ट्राचा आणि दक्षिणेचा पीएम कधीच होणार नाही- सामना