Delimitation Bill : देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? लोकसभेच्या जागा वाढणार, महिलांना आरक्षण मिळणार; डिलिमिटेशन बिलात काय आहे?
संसदेत सादर होणाऱ्या डिलिमिटेशन विधेयकामुळे लोकसभा जागांमध्ये 50% वाढ होणार असून, महिलांना 33% आरक्षण मिळेल. 1971 आणि 2011 च्या जनगणनेनुसार मतदारसंघ निश्चित केले जातील. 2029 च्या निवडणुकांपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होऊन नव्या सीमा लागू होतील.
संसदेमध्ये मांडल्या जाणाऱ्या डिलिमिटेशन विधेयकाची प्रत आता समोर आली आहे, ज्यानुसार भारतीय राजकारणात मोठे बदल अपेक्षित आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये सध्याच्या जागांपेक्षा तब्बल 50 टक्के जागा वाढणार आहेत. या वाढीव जागांसोबतच, महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्यासाठीचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.
हे नवे विधेयक लवकरच लोकसभेत सादर केले जाईल. या विधेयकानुसार, लोकसभेतील जागांची कमाल मर्यादा 850 पर्यंत वाढवली जाऊ शकते, ज्यात राज्यांमधून 835 आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 15 जागा असतील. राज्यांमधील विधानसभा जागांची संख्याही 650 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जागांच्या संख्येचे प्रमाण 1971 च्या जनगणनेच्या आधारे कायम राहील, तर मतदारसंघाच्या सीमा 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीवरून नव्याने निश्चित केल्या जातील.
या प्रक्रियेमुळे 2029 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नव्या सीमा लागू होतील आणि मतदारसंघांच्या सीमा 2051 पर्यंत गोठवलेल्या राहतील. या विधेयकात स्वतंत्र पुनर्रचना आयोग स्थापन करण्याची तरतूद असून, त्यात सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा माजी न्यायमूर्ती अध्यक्षपदी असतील. या ऐतिहासिक बदलांमुळे भारतीय लोकशाहीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे.
Published on: Nov 28, 2026 10:13 AM
देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? डिलिमिटेशन बिलात काय आहे?
त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख
विधेयकामुळे महाराष्ट्राचा आणि दक्षिणेचा पीएम कधीच होणार नाही- सामना
INDIA आघाडीच्या बैठकीकडे शरद पवार गटाची पाठ? डिलिमिटेशन विधेयकावरून...

