AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डीलिमिटेशनला पाठिंबा देणार का? बैठकीला का गेले नाही? अमोल कोल्हे यांचा मोठा दावा काय?

खासदार अमोल कोल्हे यांनी डीलिमिटेशन बिलावर राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. बिलाला पाठिंबा दिला नसल्याचे सांगत काँग्रेसच्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. इंडिया आघाडीत फूट पडल्याच्या चर्चा फेटाळून लावत, कोणताही निर्णय झाला नसून शरद पवार गट सोमवारी चर्चा करून भूमिका ठरवेल, असे कोल्हे यांनी नमूद केले.

डीलिमिटेशनला पाठिंबा देणार का? बैठकीला का गेले नाही? अमोल कोल्हे यांचा मोठा दावा काय?
amol kolheImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 12:11 PM
Share

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीने डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटाने शरद पवार यांच्यावर खोचक टीका सुरू केली आहे. पवार विश्वासघातकी असल्याची टीका करण्यापासून ते पवारांना आम्हीच राज्यसभेत पाठवल्यापर्यंतची जहरी टीका काँग्रेसने केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत मोठी फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, पवार गटाने खरोखरच डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा दिला का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. त्यावर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली असून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांची राष्ट्रवादीवरील टीका म्हणजे बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी असा प्रकार आहे. राष्ट्रवादीने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. सोमवारी आमचे 8 खासदार एकत्र बसून चर्चा करणार आहेत. खासदारांची मते विचारात घेतली जाणार आहेत. त्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत. पण निर्णय झालेला नसताना विधानं येतात दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचं दिसून येतं. इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळे झूम कॉलद्वारे उपस्थित राहणार होत्या. त्यांचं आणि जयराम रमेश यांचं बोलणं झालं होतं. पण काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी विधाने सुरू झाल्याने आम्हीच सुप्रिया सुळेंना बैठकीला उपस्थित राहू नका म्हणून सांगितलं, असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं.

सोमवारी चर्चा करून ठरवू

कालच डीलिमिटेशन बिलाचा ड्राफ्ट आला. दीड दोन दिवसात आम्ही त्याचा अभ्यास करू. त्यानंतर सोमवारी आमचे खासदार बसून चर्चा करू. विधेयक संसदेत चर्चेला आल्यावर आम्ही त्यात भाग घेणार की नाही हे कळेलच ना? आम्ही आमच्या पक्षाची भूमिका संसदेच्या पटलावर ठेवू. 1 तारखेला मतदान आहे. त्याआधीच समर्थन करणार की विरोध करणार ही चर्चा का? अंधळं समर्थन आणि अंधळा विरोध का? बिल समजून घेतल्यावरच त्यावर बोलता येईल, असं कोल्हे म्हणाले.

विधेयक संविधान विरोधी कसे?

हे विधेयक संविधान विरोधी कसं आहे हे आम्हाला काँग्रेसने समजून सांगितलं तर बरं पडेल. आतापर्यंत चार वेळा परिसीमन झालं आहे. त्या आधी 2002 साली आयोग स्थापन करण्यात आला होता. 2008 साली ते पारित झालं होतं. त्यामुळे आता विधेयक आलंय तर आम्हाला आमच्या आठही खासदारांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. आमच्या निर्णयाआधीच अशा पद्धतीने काँग्रेसने विधानं करणं चुकीचं आहे, असंही ते म्हणाले.

वडेट्टीवार काँग्रेस नेत्यांशी बोलले का?

आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला निलेश लंके उपस्थित राहणार होते. पण जयराम रमेश यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केला. त्यानंतर सुप्रिया सुळे या बैठकीला झूम कॉलवर ज्वॉईन होणार होत्या. 11 वाजता बैकठीपूर्वी विजय वडेट्टीवार हे शरद पवार यांच्यावर जहरी टीका करतात. ही टीका करण्यापूर्वी वडेट्टीवारांचा काँग्रेसच्या नेत्यांसी संपर्क झाला होता का? प्रणिती शिंदेंनीही टीका केली. त्यांचं जयराम रमेश यांच्याशी बोलणं झालं होतं का? अकारण कारण आमच्या विरोधात काढून मत बनवलं आहे. आम्ही चर्चा करत आहोत. आम्हाला बैठकीला बसायचं नव्हतं तर आम्ही आधीच सांगितलं असतं. मिठाचा खडा कोण टाकतंय? झारीतले शुक्राचार्य कोण आहे? आमच्या आठ खासदारांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. आम्हाला खासदारांशी चर्चा करून ठरवू तर द्या, असं त्यांनी सांगितलं.

डीएमकेने साथ दिली पाहिजे असं म्हणू शकतो का?

काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिला. तेव्हा डीएमकेने त्यांच्यावर टीका केली. ते स्वाभाविक होतं. काँग्रेसने टीव्हीकेला साथ दिली, त्यामुळे इंडिया आघाडीचा घटक म्हणून डीएमकेने टीव्हीकेला पाठिंबा दिला पाहिजे असं म्हणू शकतो का आपण? असा सवाल त्यांनी केला.

Follow Us
बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
Harshwardhan Sapkal On Sharad Pawar : बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वे
Mumbai Megablock Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक
महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत....
Pune Police : महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत प्रसिद्धीपत्रकातील चुकीने उडाली खळबळ
डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले, म्हणाले....
Sanjay Raut : सत्तेच्या लालसेपोटी विचारांची माती केली...; डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले
जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा जाहीर केला, पण लंके म्हणाले... आधी....
Nilesh Lanke : Delimitation Bill : जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा जाहीर केला, पण लंके म्हणाले... आधी विधेयकाचा मसुदा वाचणार
मविआत ठिणगी, आघाडीत मोठी फूट? पवारांच्या भूमिकेवर अंधारे संतापल्या....
Sushma Andhare : मविआत ठिणगी, आघाडीत मोठी फूट? शरद पवारांच्या भूमिकेवर सुषमा अंधारे संतापल्या, म्हणाल्या...
शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा... वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला
Vijay Wadettiwar : शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा... विजय वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला; डिलिमिटेशन विधेयकावरूनही राष्ट्रवादीला सुनावलं
देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? डिलिमिटेशन बिलात काय आहे?
Delimitation Bill : देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? लोकसभेच्या जागा वाढणार, महिलांना आरक्षण मिळणार; डिलिमिटेशन बिलात काय आहे?
त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख
Rohit Pawar : त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे?
विधेयकामुळे महाराष्ट्राचा आणि दक्षिणेचा पीएम कधीच होणार नाही- सामना
Saamana On Delimitation Bill : विधेयकामुळे महाराष्ट्राचा आणि दक्षिणेचा पीएम कधीच होणार नाही- सामना