AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कारणामुळे पवारांचा डीलिमिटेशनला पाठिंबा, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट

संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डीलिमिटेशन बिलाला दिलेल्या पाठिंब्यावर मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुप्रिया सुळेंना पक्षफुटीची भीती होती, असे राऊत यांनी म्हटले. यामुळे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत फूट पडली आहे. राऊत यांनी 150 कोटींच्या आरोपांसह भाजपवर लोकशाही संपवण्याचा कट रचल्याचा आरोप केला.

'या' कारणामुळे पवारांचा डीलिमिटेशनला पाठिंबा, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 11:34 AM
Share

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत मोठी फूट पडली असून महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अचानक निर्णय घेतल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. पवार गटाला सत्तेत जायचं आहे, त्यामुळेच त्यांनी डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा दिल्याचं सांगितलं जात आहे. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे राज्यात मंत्री होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी झालेल्या चर्चेचा हवाला देऊन वेगळाच गौप्यस्फोट केला आहे. राऊत यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने मोठी खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना तुमचं याबाबत सुप्रिया सुळे यांच्याशी काही बोलणं झालं का? असा सवाल करण्यात आला. त्यावर, राऊत यांनी थेट उत्तर दिलं. आमचा पक्ष फुटेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांच्या या निर्णयावर राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. तुम्हाला पक्ष की देश महत्त्वाचा? ही आमची भूमिका आहे. आमचाही पक्ष फोडला ना?. डीलिमिटेशनला पाठिंबा मिळावा म्हणून आमचे सहा खासदार फोडले. त्यामुळे आम्ही अमित शाहांच्या पायाशी गेलो नाही. मोदींच्या पायाशी गेलो नाही. आम्ही लढत राहिलो. लढत आहोत. आमदार, खासदार येतील आणि जातील, पक्ष फुटतील. पण देश आणि महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. पक्ष फुटण्याचं भय कुणाला? विचारधारा महत्त्वाची आहे. तुम्हाला भीती आहे तर तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही महाविकास आघाडीतून निवडून आला आहात, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.

तुमच्या विरोधात घोषणा दिल्या जातील

डीलिमिटेशन बिलाला जे खासदार मतदान करतील त्यांना 150-150 कोटी रुपये मिळालेत असं समजा. मीच नाही, इतरही लोक तेच सांगत आहेत. 150 कोटी घेऊन महाराष्ट्राच्या विरोधात मतदान केले जात असेल तर तुमच्या विरोधात 150 खोक्याच्या घोषणा दिल्या जातील, असा इशाराच राऊत यांनी दिला.

लोक त्यांना दाखवून देतील

राष्ट्रवादीच्या खासदारांनी चिंतन केलं पाहिजे. तुमचा एकही खासदार परत निवडून येणार नाही. मोदी आणि शाहांच्या बाजूने मतदान केलं तर हे महाराष्ट्राच्या विरोधातील मतदान ठरेल. त्याविरोधात आम्ही रान उठवू. भाजपवाले हे व्यापारी लोकं आहेत. यांनी राजकारणाचा व्यापार केला आहे. आणि पवार गटाचे लोक हे मोदी आणि शाहांच्या कच्छपी लागले आहेत. त्यांना फक्त मतदान करू द्या. महाराष्ट्र काय आहे हे जनताच दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रीती संगमावर जाऊ नका

पवारांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवलं आहे. त्यावेळी अनेकांचा विरोध होता. पवार राज्यसभेत जावे म्हणून मी पुढाकार घेतला होता. सुप्रिया सुळेंना माहीत आहे, असं सांगतानाच तुम्ही फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नका. तुम्ही प्रीती संगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीला पुष्पचक्र वाहू नका. महाराष्ट्राशी झालेली ही बेईमानी महाराष्ट्रातील माणूस सहन करणार नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

हा पवारांचा निर्णय नाही

शरद पवार यांची प्रकृती अत्यंत अस्वस्थ आहे. ते कोणताही निर्णय घेण्याच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीत नाहीत. पण फुले, शाहू आणि आंबेडकरांची विचारधारा पवारांची आहे. ही विचारधारा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या सहकाऱ्यांची होती. पण त्यांच्या सहकाऱ्यांनीच माती खाल्ली. पवारांनी त्यांना मोठं केलं. सत्ता दिली. या लोकांना सत्तेची भूक लागली आहे. त्यांनी माती खाल्ली आहे. पवार सातत्याने मोदी आणि शाहांशी लढत होते. त्यांनी कधीच कुणाशी हातमिळवणी केली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही

पवार गटाचे जे खासदार निवडून आले, त्यासाठी अमित शाह त्यांच्या प्रचाराला आले नव्हते. मोदीही आले नव्हते. तुमच्या प्रचाराला उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि शरद पवार आले होते. तुमच्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी मोदी आणि शाहांचा पराभव करण्यासाठी मतदान केलं आहे. अशावेळी त्यांच्या पायाजवळ जाऊन बसणं ही महाराष्ट्राला लागलेली ठेच आहे. यामुळे शाहांचा किती फायदा होईल माहीत नाही. तुमच्यामुळे तो होईलच. पण महाराष्ट्राचं मोठं नुकसान होणार आहे. आता राज्यातील जनता पवारांच्या पक्षावर विश्वास ठेवणार नाही, असंही ते म्हणाले.

लोकशाहीचा गळा आवळणारं बिल

डीलिमिटेशन विधेयक लोकशाहीचा गळा आवळणारं, लोकशाही खतम करणारं विधेयक आहे. 543 खासदारांच्या जागी 860 खासदार आणायचे, मतदारसंघाची पुनर्रचना आपल्या मर्जीने करायची आणि सत्ता खेचून आणायची हे भाजपचं कारस्थान आहे. भाजपने जे विजय मिळवले ते मेरिटवर आणि लोकांनी मतदान केलं म्हणून मिळवले नाहीत. भाजपने 2014 मध्ये जनतेची फसवणूक करून विजय मिळवला आहे. 15 लाख देणार असल्याचं खोटं सांगून हा विजय मिळवला आहे. त्यानंतर ईव्हीएम, व्होट चोरी आणि सीट चोरी करून सत्ता मिळवली. विरोधकांनी एक्सपोज केल्यानंतर 2029मध्ये विजय मिळवण्यासाठी डीलिमिटेशन बिल आणलं आहे. हे बिल एकदा कोसळलं आहे. प्रचंड मताधिक्याने हे बिल नाकारलं गेलं आहे. तेच विधेयक अमित शाह परत घेऊन येत असेल आणि त्यासाठी घोडेबाजार केला असेल तर देशाच्या लोकशाहीची ही अखेरची धोक्याची घंटा आहे. यापुढे देशात लोकशाही आणि स्वातंत्र्य राहणार नाही. संविधान राहणार नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत....
Pune Police : महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत प्रसिद्धीपत्रकातील चुकीने उडाली खळबळ
डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले, म्हणाले....
Sanjay Raut : सत्तेच्या लालसेपोटी विचारांची माती केली...; डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले
जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा जाहीर केला, पण लंके म्हणाले... आधी....
Nilesh Lanke : Delimitation Bill : जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा जाहीर केला, पण लंके म्हणाले... आधी विधेयकाचा मसुदा वाचणार
मविआत ठिणगी, आघाडीत मोठी फूट? पवारांच्या भूमिकेवर अंधारे संतापल्या....
Sushma Andhare : मविआत ठिणगी, आघाडीत मोठी फूट? शरद पवारांच्या भूमिकेवर सुषमा अंधारे संतापल्या, म्हणाल्या...
शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा... वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला
Vijay Wadettiwar : शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा... विजय वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला; डिलिमिटेशन विधेयकावरूनही राष्ट्रवादीला सुनावलं
देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? डिलिमिटेशन बिलात काय आहे?
Delimitation Bill : देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? लोकसभेच्या जागा वाढणार, महिलांना आरक्षण मिळणार; डिलिमिटेशन बिलात काय आहे?
त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख
Rohit Pawar : त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे?
विधेयकामुळे महाराष्ट्राचा आणि दक्षिणेचा पीएम कधीच होणार नाही- सामना
Saamana On Delimitation Bill : विधेयकामुळे महाराष्ट्राचा आणि दक्षिणेचा पीएम कधीच होणार नाही- सामना
INDIA आघाडीच्या बैठकीकडे शरद पवार गटाची पाठ? डिलिमिटेशन विधेयकावरून...
INDIA आघाडीच्या बैठकीकडे शरद पवार गटाची पाठ? डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय चर्चांना नवं वळण
.....मग भाजपला पाठिंबा का? काँग्रेसच्या त्या पोस्टने चर्चांना उधाण
Congress On Sharad Pawar : शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसने जागा सोडली, मग भाजपला पाठिंबा का? काँग्रेसच्या त्या पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण