AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. राजेंद्र रुपनवर मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; शेवटच्या जबाबातून खळबळजनक माहिती उघड

डॉ.राजेंद्र रुपनवर मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात डॉ. रुपनवर यांच्या शेवटच्या जबाबातून खळबळजनक माहिती उघड झाली आहे.

डॉ. राजेंद्र रुपनवर मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; शेवटच्या जबाबातून खळबळजनक माहिती उघड
rajendra rupanwar news update Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 01, 2026 | 9:03 AM
Share

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा मुंबईत मृत्यू झाला. त्यांनी 27 ऑगस्ट रोजी डॉ. राजेंद्र यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी रुग्णालयातील अंतर्गत वाद आणि बदलीमुळे आयुष्य संपवल्याचा आरोप केला जात आहे.

डॉ. राजेंद्र यांनी आत्महत्येआधी हातावर शेवटचा संदेश लिहून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. डॉ. राजेंद्र रुपवनकर यांच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फलटन उपजिल्हा रुग्णालयाचे उपाधीक्षक डॉ. लीला मदने यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. डॉ. रांजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूनंतर मार्ड, मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

सुषमा अंधारेंची सोशल मीडिया पोस्ट जशीच्या तशी

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना राजेंद्र रुपनवर यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे. सुषमा अंधारे यांनी पोस्ट करत म्हटलं की,’सकाळी मी डॉक्टर राजेंद्र रुपनवर या फलटणच्या शासकीय रुग्णालयातील तरुण डॉक्टरच्या आत्महत्येच्या संदर्भाने लिहिले. तेव्हा काही लोकांचा गैरसमज झाला की, डॉक्टरांनी मला संपर्क केला मात्र मी त्यांना रिप्लाय दिला नाही. खरंतर डॉ. राजेंद्र रुपनवर गरीबी आणि कष्टातून वाढलेला मुलगा मुंबईच्या जेजे मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर होऊन बाहेर पडले आणि फलटणच्या शासकीय रुग्णालयामध्ये रुजू झाले. साधारण दीड महिन्यापूर्वी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा रुपनवर यांचं म्हणणे समजून घेण्यासाठी मी सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तक्रार केली तर आपल्याला पुन्हा नोकरीवरून काढून टाकतील. वरिष्ठ अधिकारी पुन्हा त्रास देतील, या भीतीने डॉक्टर राजेंद्र रुपनवर अजिबात बोलायला तयार नव्हते. त्यांनी बोलावं यासाठी अनेक पत्रकारांनी सुद्धा आणि त्यांच्या समवयस्क डॉक्टर मित्रांनी सुद्धा त्यांना अनेक वेळेला सांगितलं. मात्र डॉक्टर रुपनवर यांनी माघार घेतली’.

‘कदाचित या आठ दहा दिवसात डॉक्टर रुपनवर यांना पुन्हा नव्याने खूप जास्त त्रास होत असावा. त्यांनी मला जो फोन करण्याचा प्रयत्न केला, तो अगदी शेवटच्या क्षणी असावा. कारण हे मेसेजेस मिळाल्याबरोबर लगेचच मी फोन करण्याचा प्रयत्न केले, मात्र ते अयशस्वी ठरले. दोन दिवसांपूर्वी डॉक्टरने सायनमध्ये एका टॉवरवरून उडी घेतली. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काल सकाळपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर आहे असे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र आज अचानक त्यांना मृत घोषित करण्यात आले. दीड महिन्यापूर्वी ज्या डॉक्टरांनी आपल्या मृत्यूस कोण कारणीभूत आहे, याची नावे तळहातावर लिहून प्रयत्न केला होता. त्याच डॉक्टरांनी काल मात्र आपला शेवटचा जबाब देताना, “माझी कुणा बद्दलही तक्रार नाही. मृत्यूपश्चात माझा देह एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला प्रशिक्षणासाठी दान देण्यात यावा, असे म्हटले. डॉक्टरांचा हा जबाब स्वखुशीने की दबावाखाली हेही समजायला मार्ग नाही. पण या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो तो हा की, मुळात फलटणच्या शासकीय रुग्णालयात नेमकं असं काय घडतंय किंवा वारंवार तेथील डॉक्टर तणावात जातात, मानसिक दडपणाखाली येतात आणि आत्महत्या करतात? कदाचित दीड महिन्यापूर्वी सदर डॉक्टरांनी मोकळेपणाने बोलायचं प्रयत्न केला असता तर मी त्यांच्यासाठी काही करू शकले असते, अशी खंत अंधारे यांनी बोलून दाखवली.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा