AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपदा मुंडेनंतर त्याच फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टराने घेतला धक्कादायक निर्णय, वरिष्ठांवर..

संपदा मुंडे प्रकरण ताजे असतानाच फलटणच्या त्याच उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टराने धक्कादायक पाऊस उचलले. त्यानंतर आता कुटुंबियांकडून मोठे गंभीर आरोप केली जात आहेत. फलटणचे उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत आले.

संपदा मुंडेनंतर त्याच फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टराने घेतला धक्कादायक निर्णय, वरिष्ठांवर..
Rajendra Rupanwar
| Updated on: Sep 01, 2026 | 8:27 AM
Share

साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या संपदा मुंडे यांनी काही गंभीर आरोप करून आयुष्याचा शेवट केला. तळहातावर एक नोट लिहिली. ज्यानंतर काही राजकीय नेत्यांवरही गंभीर आरोप करण्यात आली. थेट नेत्यांची नावे पुढे आली. राज्यभरात हे प्रकरण तापले होते. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून संपदा यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले. आपल्याला त्रास दिला जात होता, असेही म्हटले होते. संपदा मुंडे प्रकरण ताजे असतानाच आता त्याच फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या एका डॉक्टरानेही तोच निर्णय घेतला. डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला. डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी 27 तारखेला सायन रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून गळफास घेतला. ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयातील अंतर्गत वादातून आणि बदली झाल्यामुळे त्यांनी जीवन संपल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर संपदा मुंडे प्रमाणेच . राजेंद्र रुपनवर यांनीही आपल्या हातावर नोट लिहिली. यानंतर तात्काल वैद्यकीय उपधिक्षक डॉक्टर लीला मदने यांचे निलंबन करण्यात आले. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाली.

जोपर्यंत आमच्या मुलाला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. संपदा मुंडेनंतर फलटणच्या रुग्णालयात अजून एका डॉक्टरचा जीव गेला. याप्रकरणात कुटुंबियांकडून गंभीर आरोप केली जात आहेत. रुपनवर यांनी आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना आपल्याला नक्की काय त्रास होत आहे, हे सांगितले होते.

फलटणच्या रुग्णालयातील हा दुसऱ्या डॉक्टरचा बळी ठरला आहे. संपदा मुंडेला न्याय मिळाला नसताना डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांनी धक्कादायक पाऊस उचलले. डॉक्टर राजेंद्र रूपनवर जेजे मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाले होते. त्यानंतर फलटणच्या रूग्णालयात ते डॉक्टर म्हणून रूजू झाले. काही दिवसात राजेंद्र रुपनवर यांनी हा धक्कादायक निर्णय घेतला. संपदा मुंडेनंतर राजेंद्र रुपनवर यांनीही तेच पाऊल उचलल्याने फलटणच्या रुग्णालय नवीन डॉक्टरांसोबत नक्की काय घडते, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप