AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री मुरलीधर मोहोळांच्या ताफ्यातील गाडीला धडक, मद्यधुंद होऊन… गुन्हा दाखल, आरोपी ताब्यात

Murlidhar Mohol News : पुण्यातील संचेती पुलाजवळ मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कॅनवामधील गाडीला मद्यप्राशन केलेल्या चालकाने मागून धडक दिल्याची घटना घडली आहे. शुभम माळी असं आरोपीचं नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.

मंत्री मुरलीधर मोहोळांच्या ताफ्यातील गाडीला धडक, मद्यधुंद होऊन... गुन्हा दाखल, आरोपी ताब्यात
Minister Muralidhar Mohol car accident PuneImage Credit source: social media
| Updated on: Sep 15, 2026 | 8:11 PM
Share

दीपक कापरे, टीव्ही९ मराठी, पुणे: पुण्यातील संचेती पुलाजवळ मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कॅनवामधील गाडीला मद्यप्राशन केलेल्या चालकाने मागून धडक दिल्याची घटना घडली आहे. शुभम माळी असं आरोपीचं नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

नक्की घटना कशी घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शिवाजीनगर येथील संचेती पुलाजवळ घडली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे विमानतळावरून शिवाजीनगर मार्गे कोथरूड येथील आपल्या निवासस्थानाकडे ताफ्यासह जात होते. याच वेळी आरोपी शुभम माळी याने प्रचंड दारूच्या नशेत आपली कार बेदरकारपणे चालवत व्हीआयपी ताफ्यामध्ये आणली आणि ताफ्यातील एका गाडीला मागून थेट धडक दिली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा इशारा देऊनही त्याने बेधडकपणे पुढे जाण्याचा प्रयत्न केला. अखेर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले.

पोलिसांची कारवाई आणि गुन्हा दाखल

मंत्र्यांच्या सुरक्षा पथकात कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस फौजदार ईश्वर भिकुले यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी शुभम माळी याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली, ज्यामध्ये त्याने मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १८५ आणि ११९/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार त्याला नोटीस बजावण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक विकास काटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

डीसीपी ऋषिकेश रावले यांची प्रतिक्रिया

या घटनेबाबत अधिकृत माहिती देताना पोलीस उपायुक्त (DCP) ऋषिकेश रावले यांनी सांगितले की, “संचेती पुलाजवळ ही घटना घडली असून आरोपी शुभम माळी याने मद्यप्राशन केले होते. मद्यधुंद अवस्थेत त्याने मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कॉन्व्हॉयमधील गाडीला मागून धडक दिली. याप्रकरणी आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा