नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पाण्याखाली; कळसाला लागले पाणी; राधानगरी धरणातील विसर्ग वाढल्यामुळे पूर

मंदिर परिसरात ज्या ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे, त्या ठिकाणी नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. पुराच्या पाण्यात हुल्लडबाजी करणाऱ्यांनाही पोलिसांनी पूर परिस्थिती असताना पाण्यात उतरू नेय अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पाण्याखाली; कळसाला लागले पाणी; राधानगरी धरणातील विसर्ग वाढल्यामुळे पूर
| Edited By: | Updated on: Aug 12, 2022 | 5:29 PM

इचलकरंजीः कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीक्षेत्र नरसिंह वाडी (Nrisimhwadi) मंदिरामध्ये पाणी आल्यामुळे पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उत्सवमूर्तीवरील सभामंडप दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Rain) काही भागामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली असली तरी राधानगरी आणि कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोयना व राधानगरी धरणातून (Radhanagari Dam) पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून एनडीआरएफ टीम, जिल्हा प्रशासन टीम सज्ज करण्यात आली आहे.

दत्त मंदिरात पाणी

मंदिर परिसरात ज्या ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे, त्या ठिकाणी नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. पुराच्या पाण्यात हुल्लडबाजी करणाऱ्यांनाही पोलिसांनी पूर परिस्थिती असताना पाण्यात उतरू नेय अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नरसिंहवाडी मंदिर पूर्ण पाण्याखाली

कोल्हापू, सातारा आणि सांगली परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली. त्यातच राधानगरी आणि कोयना धरण परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने धरणातून पाणी विसर्गही चालू आहे. त्यामुळे धरणाखाली असणाऱ्या नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यामुळ नृसिंहवाडीचे पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!