सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांचे बेळगावसह सीमा भागातील हुतात्म्यांना अभिवादन

| Updated on: Jan 17, 2021 | 11:35 AM

सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावसह सीमा भागातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केलं आहे.

सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांचे बेळगावसह सीमा भागातील हुतात्म्यांना अभिवादन
eknath shinde
Follow us on

मुंबई : सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावसह सीमा भागातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केलं आहे. एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, “बेळगाव सीमा भागातील हुतात्म्यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्वोच्च बलिदान आहे. बेळगाव आणि सीमा भाग महाराष्ट्रात येईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही”. (Eknath Shinde greets the martyrs in the border areas including Belgaum)

शिंदे यावेळी म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण बेळगाव आणि सीमाभागासाठीची न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू. बेळगाव आणि सीमाभाग महाराष्ट्रात येईल, असा आम्हाला विश्वास आहे. सीमा लढ्यात तुरुंगवास भोगल्याने माझा आणि सहकारी सीमा भाग समन्वयक मंत्री छगन भुजबळ यांचं या लढ्याशी भावनिक नातं आहे. आम्ही हुतात्म्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही”.

सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज बेळगावात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. दरम्यान, हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर बेळगावला जाणार आहेत. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना बेळगावात प्रवेश दिला जाणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान, विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील आज बेळगावात दाखल झाले आहेत.

औरंगाबादचं नामांतर होणार?; एकनाथ शिंदेंनी केलं मोठं विधान

औरंगाबादच्या नामांतराचा वाद काही थांबताना दिसत नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर होणारच असं स्पष्ट केल्यानंतर आता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. संभाजीनगर हा स्थानिकांच्या अस्मितेचा विषय आहे. सरकार तिथल्या भावनांचा आदर करणार, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे काल (16 जानेवारी) सोलापुरात बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, संभाजीनगर हा तिथल्या स्थानिकांच्या अस्मितेचा विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचा नामोल्लेख संभाजीनगरच केला जातो. त्यामुळे सरकार तिथल्या लोकांच्या भावनांचा आदर करेल. जे लोकांना हवं आहे, तोच निर्णय सरकार घेणार, असं सांगतानाच नामांतराचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणण्याबाबत मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेतेच निर्णय घेतील, असं ते म्हणाले. औरंगजेबबाबत कुणाचं प्रेम असण्याचं कारणही नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, वाशी टोल नाक्याजवळची घटना

(Eknath Shinde greets the martyrs in the border areas including Belgaum)