AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 वाजता काय घडणार? एकनाथ शिंदेंनी बोलावली कॅबिनेट मंत्र्यांची तातडीची बैठक, सर्व मंत्र्यांना काय दिले आदेश?

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असतानाच आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या खासदारांपैकी नक्की कोणाला मंत्रिपद मिळते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

2 वाजता काय घडणार? एकनाथ शिंदेंनी बोलावली कॅबिनेट मंत्र्यांची तातडीची बैठक, सर्व मंत्र्यांना काय दिले आदेश?
Eknath Shinde
| Updated on: Jul 14, 2026 | 1:57 PM
Share

शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी 6 खासदारांनी केली. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र गट स्थापनेचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. त्यानंतर या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पुढे आली. काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. हेच नाही तर ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांपैकी दोघांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. यादरम्यान राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार 17 जुलै रोजी होणार आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रिपद तर दोन राज्यमंत्री पद येणार असल्याचे समजते. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शिंदे यांची बैठक होणार आहे. चार्टड विमानाने खासदार आजच दिल्लीला रवाना होणार असल्याचे समजते. श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच एकनाथ शिंदे यांनी तातडीने सर्व त्यांच्या पक्षातील कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. नंदनवन इथे 2 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले. सर्व मंत्र्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली आहे.

शिंदे नक्की काय निर्णय घेतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. ठाकरे गटातून बंडखोरी करून आलेल्या खासदारांमध्ये मंत्रिपदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळत आहे. मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. 6 खासदारांपैकी नक्की कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांचा समावेश थेट केंद्रीय मंत्रिमंडळात होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणा आहे. 17 जुलैला हा विस्तार होणार असल्याचे कळतंय. अनेक नव्या चेहऱ्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार आहे. कॅबिनेटमध्ये असलेल्या काही मंत्र्यांना थेट नारळ दिले जाणार आहे. त्यामध्ये राज्याला नक्की कोणती कोणती खाती मिळतात, हे देखील 17 जुलैला स्पष्ट होईल.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक