AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार, घडामोडींना वेग, कॅबिनेटच्या..

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दाैऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांच्या या दाैऱ्याला महत्वप्राप्त झाले. दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. तातडीने एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झाले.

एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार, घडामोडींना वेग, कॅबिनेटच्या..
Eknath Shinde
| Updated on: Jul 14, 2026 | 9:55 AM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दाैऱ्यावर आहेत. अगोदर शरद पवार यांच्यासोबत बैठक आणि त्यानंतर आज थेट दिल्ली दाैऱ्यावर एकनाथ शिंदे निघाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या या दाैऱ्याला महत्व प्राप्त झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्ली दाैऱ्यावर होते. यादरम्यान त्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी दिल्ली घडामोडींना वेग येत आहे. आज एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. ऑपरेशन टायगरनंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दाैरा आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. 6 खासदारांपैकी दोन जणांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडणार आहे. यासोबतच श्रीकांत शिंदे देखील केंद्रीय मंत्री होणार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दाैऱ्याकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत. ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदे यांचे यशस्वी झाले. नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. त्याच ज्या केंद्रीय मंत्र्यांची कामगिरी चांगली राहिली नाही, अशांना नारळ दिले जाईल. श्रीकांत शिंदे यांच्यासोबतच ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या 2 खासदारांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार आहे.

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यापूर्वीच एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर आहेत. त्यांच्या दिल्ली दाैऱ्यात भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी असून मंत्रिपदाची नावे फायनल होतील, असे सांगितले जातंय.

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. हेच नाही तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असेही सांगितले जात आहे. मात्र, यावर भाजपाकडून काही भाष्य करण्यात आले नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात दिल्ली घडामोडींना वेग आला. राघव चड्ढा यांनाही केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षातून त्यांनीही मोठी बंडखोरी केली.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे