मोठी राजकीय घडामोड! CM फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट, काय चर्चा झाली?

पुण्यात मोठी राजकीय घडामोड घडू लागल्या आहेत. CM फडणवीसानंतर आता एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली.

मोठी राजकीय घडामोड! CM फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट, काय चर्चा झाली?
eknath shinde news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 16, 2026 | 11:06 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा हे पुण्यात आल्यानंतर राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात पोहोचले. पुण्यात पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती समोर आलेली नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. आज अमित शहा यांचे पुण्यात तीन कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाआधी अनेक नेते त्यांच्या भेटीला पोहोचत आहेत. काल देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यानंतर आज सोमवारी एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. तसेच ओमराजे निंबाळकर यांनीही भेट घेतली. तर भाजपचे चंद्रकांत पाटील, रविंद्र चव्हाण यांनीही भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीस, शिंदे, रवींद्र चव्हाण यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शहा हे पुण्यात जे. डब्लू. मेरिएट मुक्कामी आहेत. या हॉटेलमध्ये सर्व नेत्यांची बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Loading...

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us