लोकांना वाईट वाटलं तर वाटू द्या, डीजे बंदी झालीच पाहिजे, शिंदेंच्या मंत्र्याची रोखठोक भूमिका!

Shinde Shiv Sena Minister Sanjay Shirsath On DJ ban : ‘लोकांना वाईट वाटलं तर वाटू द्या, डीजे बंदी झालीच पाहिजे’, अशी रोखठोक भूमिका शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मांडली आहे.

लोकांना वाईट वाटलं तर वाटू द्या, डीजे बंदी झालीच पाहिजे, शिंदेंच्या मंत्र्याची रोखठोक भूमिका!
Sanjay shirsath On DJ ban
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 4:31 PM

सध्या राज्यामध्ये गणेशोत्सवाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. पुढील आठवड्यामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे. त्यापूर्वीच गेल्या आठवड्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे, ज्याला पार्श्वभूमी आहे ती डीजेची. डीजेमुळे नाहक त्रास होतो, अशा भूमिकेतून राज्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांची मत मांडत आहेत. यासगळ्याची सुरुवात पुण्यातून झाली. पुण्यातील विद्यानंद बापटांनी सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे आणि लाऊडस्पीकर नसावेत अशी भूमिका सर्वात आधी मांडली होती. त्यानंतर ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. अनेक मुलाखतींमधून त्यांचं मत मांडलं. तर दुसरीकडे नागपुरात गणेशोत्सवाच्या काळात डीजेवर बंदी घालण्यात आली आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

दरम्यान, आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी डीजेबंदीचं जाहीर समर्थन केलं आहे. त्यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी संजय शिरसाट म्हणाले की,”डीजे बंदीमुळे काही लोकांना वाईट वाटत असेल तर वाटू द्या. कारण लहान बालकं, वयोवृद्ध लोक असतील तसेच आजारी लोक असतील त्यांना याचा प्रचंड त्रास होतो. लहान मूलं मिरवणुकीत येत नाहीत. ते मिरवणुका पाहुही शकत नाहीत. ज्या ज्या ठिकाणावरुन मिरवणूक जाते. तेथील लोकांना त्याचा त्रास असतो, हे आपण नाकारु शकत नाही,” असं शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us