‘सन बाथ’ नव्हे हा ‘सन घात’.. थकलेले जीव झोपले समुद्र किनारी, मुंबईतील व्हायरल व्हिडीओ चर्चेला उधाण…

परदेशात लोक समुद्रकिनारी 'सन बाथ' घेत झोपलेले असतात.आपल्या येथेही गोव्यात आल्यानंतर परदेशी लोक सन बाथ करत असतात, परंतू वर्सोवा येथे समुद्र किनारी झोपलेल्या या लोकांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सन बाथ नव्हे हा सन घात.. थकलेले जीव झोपले समुद्र किनारी, मुंबईतील व्हायरल व्हिडीओ चर्चेला उधाण...
versova beach viral video
| Updated on: Jun 19, 2026 | 7:46 PM

मायानगरी मुंबई हे कधीही न झोपणारे शहर म्हटले जाते. मात्र,सध्या पावसाने ओढ दिल्याने मुंबईतील उष्णता प्रचंड वाढली असताना सोशल मीडियावर मुंबईतील वर्सोवा बीचचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओने रुपेरी मुंबईतील एक वेगळेच रुप समोर आले आहे. वर्सोवा बीचच्या वाळूवर रहिवाशी झोपल्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबईत झोपड्यात राहणाऱ्या रहिवाशांची मजबूरी या व्हिडीओतून समोर आली आहे. अनेक जण आजूबाजूच्या झोपड्यात उकाड्याने हैराण होत असल्याने त्यांच्यावर अशी समुद्र किनारी वाळुवर झोपण्याची वेळ आली आहे.

मुंबईत जूनचा महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे आता रात्रीचे तापमानही देखील ३२ डिग्रीवर आले आहे. त्यामुळे हवेतील ह्युमिडीटी वाढल्याने लोकांना अशा प्रकारे वाळुवर पथारी पसरुन झोपावे लागत आहे.

काय कारण आहे यामागे ?

हे कोणी अतिक्रमण किंवा बेघर लोक नाहीत. तर वर्सोवा बीचच्या काही मीटर दूरवरील वस्तीतील आणि झोपडपट्टीत राहणारे नागरीक आहेत. मुंबईत या वर्षी पडलेल्या प्रचंड उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या आणि उकाड्याने जीवाची काहीली होणारी ही जनता आहे. ज्यांच्या पत्र्याच्या घरात उकाड्याने जीव कासाविस झाल्याने त्यांनी हा विस्तीर्ण किनाऱ्यावर झोपण्याचा निर्णय घेतला आहे.

येथे पोस्ट पाहा –

एस्बेस्टॉसचे पत्रे असलेल्या घरात दिवसभर कडक उन्हाने तापत असल्याने लोकांना त्यात झोपणे काय तर मिनिटभरही थांबता येत नाही. रात्रीही या भट्टीत घामामुळे लोकांना भिजायला होत असते. त्यात जर वीज गेली तर आणखीनच पंचायत. अशा अवस्थेत तळमळण्यापेक्षा या समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकारे उघड्यावर वाळूवर या लोकांना झोपायला बरे वाटते. रात्रभर मोकळी हवेत झोपायचे आणि सकाळी उठून पुन्हा आपआपल्या घरी जाऊन पोटापाण्याला लागण्यासाठी पुन्हा लोकल लटकून कामाला जातात.

 

Follow Us