Ashok Kharat : काळे पडलेले पेढे, काळ्या रंगाची फळे आणि संशयास्पद यंत्रं… खरातच्या ऑफीसमध्ये काय काय सापडलं ?

भोंदू अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात असून उद्या त्याची कोठडीची मुदत संपणार आहे. ज्योतिष आणि भविष्य पाहण्याच्या नावाखाली खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. SIT पथक तपास करत असून त्याच्या कार्यालयातून धक्कादायक फॉरेन्सिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. पीडित महिलांनीही पुढे येऊन त्याच्या कृत्यांचा पर्दाफाश केला आहे.

Ashok Kharat : काळे पडलेले पेढे, काळ्या रंगाची फळे आणि संशयास्पद यंत्रं... खरातच्या ऑफीसमध्ये काय काय सापडलं ?
अशोक खरातच्या ऑफीसची तपासणी
| Updated on: Mar 31, 2026 | 7:25 AM

भोंदू अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात असून उद्या, 1 एप्रिल रोजी त्याची पोलिस कोठडीचची मुदत संपणार असून पुन्हा कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. भविष्य पाहण्याचा, ज्योतिष सांगण्याचा बहाणा करून तो अनेक महिलांना फसवायचा, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा असा आरोप खरातवर आहे. एवढंच नव्हे तर त्याने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक, लुबाडणूक केली असाही आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. एसआयटीचं पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून भोंदू खरातचे अनेक कारनामे, त्याची अश्लील कृत्य, लोकांना फसवण्यासाठी त्याने वापरलेल्या युक्त्या, या एकेक गोष्टींचा आता पर्दाफाश होत आहे.

खरातच्या ऑफीसमधये सापडले धक्कादायक पुरावे

दरम्यान उद्या भोंदू अशोक खरातला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून त्यापूर्वी खरातच्या ऑफिसची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. पोलिसांनी हे ऑफीस सील केलं, होतं, त्याची त्यांनी तपासणी केली, तेथे पुराव्यांचा शोधही घेतला. यावेळी फॉरेन्सिक टीमने भक्तांची नोंद असलेली वही जप्त केली. तसेच त्यांना तिथे काळे पडलेले पेढे, काळ्या रंगाची फळे आणि संशयास्पद यंत्रंही सापडली, जी ताब्यात घेण्यात आली.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक शोषित महिलांनी पुढे येऊन खरातच्या कृत्यांचा पाढा वाचला आहे. तपासाचा भाग म्हणून पीडित महिलेला घटनास्थळी नेऊन क्राइम सीन रीक्रिएशन करण्यात आलं, अशीही माहिती समोर आली आहे. ज्या ऑफीसमध्ये खरात हा महिलांना भुलवून त्यांचं शोषण करायचा, त्या शोषण झालेल्या केबिनची देखील सखोल तपासणी करण्यात आली. खरातचया ऑफीसमध्ये साऊंडप्रूफ काच व दरवाजे लावण्यात आले आहेत, तेही तपासण्यात आले. त्याच्या केबिनमधील आवाज बाहेर जात होता का? बाहेरच्यांना तो ऐकू येतो का याचाही शोध घेण्यात आला. पोलिसांकडून वैज्ञानिक पद्धतीने पुरावे संकलित करण्यात आले असून या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे.

सुषमा अंधारे यांचा नामकर्ण आवारेवर थेट आरोप..

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नामकर्ण आवारेवर थेट आरोप केला आहे. “प्रत्येक फोटोत दिसणारा नामकर्ण कोण ?” – अंधारे यांनी हाँ सवाल विचारला आहे. आवारे याचे अशोक खरातसोबत निकट संबंध असल्याचे समोर आले आहे, मात्र माझा “खरातशी कोणताही संबंध नाही” असा दावा नामकर्ण आवारेने केला आहे.

2012 च्या “असा मी नामकर्ण” पुस्तकाची प्रस्तावना खुद्द अशोक खरात यांनी लिहिली. पुस्तकात खरातला “ब्रह्मांडनायक” आणि “सिद्धपुरुष” अशी उपाधि दिली. दोन दिवसांपूर्वी आवारेने माध्यमांना मुलाखत दिली ती चर्चेत होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us