AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुहूत 2 फ्लॅट, सोने-चांदी, कोट्यवधींची एफडी… अभिनेत्रीच्या निधनानंतर केअरटेकरने केला संपत्तीवर कब्जा

बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनानंतर तिची काळजी घेण्याऱ्या वक्तीने संपत्तीवर कब्जा केला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? वाचा...

जुहूत 2 फ्लॅट, सोने-चांदी, कोट्यवधींची एफडी... अभिनेत्रीच्या निधनानंतर केअरटेकरने केला संपत्तीवर कब्जा
NimmiImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 1:30 PM
Share

एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री निम्मी यांच्या निधनाच्या ६ वर्षांनी त्यांच्यासोबत मोठी फसवणुकी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जुहूमधील त्यांच्या ७-८ कोटी रुपये किमतीच्या दोन फ्लॅट्सवर कब्जा करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. याशिवाय बँक खात्यांमधून कोट्यवधी रुपयांच्या हेराफेरीचाही दावा करण्यात आला आहे. अभिनेत्रीच्या एका नातेवाईकाने त्यांच्या दीर्घकाळ केअरटेकर राहिलेल्या असरार अहमद शेख यांच्यावर बँक खात्यांमधून कोट्यवधी रुपये काढल्याचा आणि जुहूमधील दोन फ्लॅट्स हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला आहे. या तक्रारीच्या आधारे मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

११ नोव्हेंबरला मोहम्मद युनुस सलीम दुर्रानी यांनी तक्रार दाखल केली. दुर्रानी यांचा दावा आहे की ते अभिनेत्री निम्मी यांचे नातेवाईक आहेत आणि त्यांच्या सुने सलमा नेल्दी परवीन यांच्याकडून पॉवर ऑफ अॅटर्नीच्या आधारे ही तक्रार करत आहेत.

एफआयआरमध्ये काय आहे?

एफआयआरनुसार असरार अहमद शेख अनेक वर्षे अभिनेत्री निम्मी आणि त्यांचे पती अली रजा यांच्याकडे घरगुती मदतनीस आणि केअरटेकर म्हणून काम करत होते. २००७ मध्ये अली रजा यांच्या निधनानंतर निम्मी एकट्या राहू लागल्या. वाढत्या वयामुळे आणि आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे त्यांनी केअरटेकर असरार शेख यांच्यासोबत संयुक्त बँक खाती उघडली होती. त्यानंतर असरार अभिनेत्रीच्या आर्थिक व्यवहार आणि पैशांशी संबंधित बाबी हाताळत होते.

जुहूमध्ये २ फ्लॅट, बँकेत १.७७ कोटींची एफडी

समोर आलेल्या माहितीनुसार निम्मी आणि त्यांच्या पतीने जुहू तारा रोडवरील नेहा अपार्टमेंटमध्ये बी-३१ आणि बी-३२ क्रमांकाचे दोन फ्लॅट्स खरेदी केले होते. यासोबत त्यांच्याकडे पार्किंगची जागाही होती. दोन्ही फ्लॅट्स अभिनेत्रीच्या नावावरच नोंदणीकृत होते. याशिवाय त्यांच्याकडे सोने-चांदीचे दागिने, मारुती सुझुकी सिआज कार आणि भारतीय स्टेट बँक तसेच सारस्वत बँकेत सुमारे १.७७ कोटी रुपयांची एफडीही होती. निधनापूर्वी निम्मी यांनी मृत्युपत्र तयार केले होते, ज्यात गुरपाल सिंग, हरबंस सिंग सचर यांना मृत्युपत्राचे कार्यकारी म्हणून नियुक्त केले होते. मृत्युपत्रानुसार अभिनेत्रीने आपली बँक जमा रक्कम, दोन्ही फ्लॅट्स, दागिने, पार्किंग आणि इतर संपत्ती आपला दत्तक मुलगा अली सैयद परवेज आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावर केली होती. मात्र डिसेंबर २०२० मध्ये अली सैयद परवेज यांचेही ब्रिटनमध्ये निधन झाले. त्यांच्या कुटुंबात पत्नी सलमा नेल्दी परवीन आणि तीन मुले आहेत.

केअरटेकरवर बँक खाती रिकामी करण्याचा आरोप

तक्रारदारांचा आरोप आहे की निम्मी यांच्या निधनानंतर केअरटेकरने त्यांची संपत्ती आणि बँकेत जमा रकमेचा कथितपणे गैरवापर केला. आरोप आहे की त्याने एफडीच्या रकमेचा गैरवापर केला आणि अभिनेत्रीची कार भंगार म्हणून विकून मिळालेली रक्कमही वैयक्तिक वापरात आणली. कुटुंबाचा आरोप आहे की केअरटेकर मृत्युपत्राची माहिती देण्यास तयार नव्हता. त्यानंतर कुटुंबाने बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल करून मृत्युपत्राची माहिती मिळवली. कुटुंबानुसार मृत्युपत्र समोर आल्यानंतर त्यांना अभिनेत्रीच्या संपत्ती आणि आर्थिक गुंतवणुकीबद्दल माहिती मिळाली.

तक्रारदारांचा दावा काय आहे?

तक्रारदार मोहम्मद युनुस सलीम दुर्रानी यांनी दावा केला आहे की जुहूचे दोन्ही फ्लॅट सध्या बंद पडले आहेत, ज्यांची किंमत सुमारे ६ वर्षांपूर्वी ७ ते ८ कोटी रुपये होती. त्यांचा आरोप आहे की केअरटेकरने हे फ्लॅट्स विकून रक्कम वाटून घेण्याचा प्रस्तावही आणला होता, पण त्यांनी तो नाकारला. सध्या मृत्युपत्राशी संबंधित प्रोबेटची प्रक्रिया बॉम्बे हायकोर्टात प्रलंबित आहे. तक्रारदारांनी आरोप लावला आहे की तरीही केअरटेकर अभिनेत्रीच्या संपत्तीशी अवैध व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोण होत्या अभिनेत्री निम्मी?

निम्मी या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांचे खरे नाव नवाब बानो होते. १९४० आणि १९५० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटांत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. राज कपूर आणि दिलीप कुमार यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले. आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर त्यांनी त्या काळात प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली होती. २०२० मध्ये कोरोना महामारीदरम्यान त्यांचे निधन झाले होते.

Follow Us
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!