
रायगड जिल्ह्यातून सध्या मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रायगडमधील मांडवाजवळ मच्छीमारांची बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबतची माहिती मिळताच आता बचावकार्य चालू झाले आहे. बोट नेमकी का आणि कशी बुडाली याबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.
हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार रायगडमधील मांडवाजवळ मच्छीमारांची बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत माहिती मिळताच आता बचावकार्य चालू झाले आहे.
हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार काही खलाशी मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेले होते. मात्र काही कारणास्तव त्यांची बोट बुडाली. या बोटीत एकूण आठ मच्छीमार होते. यातील पाच मच्छीमांराना वाचवण्यात यश आलेले आहे. तर उर्वरीत तीन खुलाशांचा शोध सध्या चालू आहे. खंदेरी किल्ल्याजवळ उरलेल्या खुलाशांचा शोध घेतला जात आहे.
काही खलाशी मासे पकडण्यासाठी समुद्रात गेले होते. मात्र खंदेरी किल्ल्याजवळ समुद्राच्या मोठ्या लाटा आल्या. या लाटांमुळे बस उलटली आणि ती समुद्रात बुडाली. सध्या या भागात मासेमारी करण्यासाठी बंदी आहे. असे असताना ही काही खलाशी मासेमारी करण्यासाठी गेले होते.
एकूण आठ खलाशांपैकी पाच खलाशी हे तब्बल नऊ तास पोहून समुद्र किनाऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या धाडसाचे कौतुक केले जात आहे. अपघातग्रस्त बोट आज (26 जुलै) सकाळी करंजा परिसरातून मासेमारी करण्यासाठी निघाली होती. बचावलेल्या पाच खलाशांवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. तर उर्वरित तिघा खलाशांचा शोध सुरू आहे.
विशेष म्हणजे, मासेमारीवरील बंदी अद्याप शिल्लक असतानाही ही बोट समुद्रात गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारा वेळोवेळी चर्चेत येतो. काही दिवसांपूर्वी याच जिल्ह्यातील समुद्रात पाकिस्तानातील बोटीचा एक भाग दिसल्याचा दावा केला जात होता. नंकोर्लईजवळ रडारवर आढळलेली वस्तू बोट नसून, पाकिस्तानी मासेमारी बोटीवरील जीपीएसयुक्त बोया असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. मात्र याबाबत ही माहिती मिळताच तेथील पोलिसांनी जिल्हाभर सर्च ऑपरेशन केले आले होते. नंतर मूळ जहाज पाकिस्तानात असून त्या जाहाजाचा जीपीएसयुक्त बोया वाहून आल्याचे समोर आले होते.