AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमान अपघातामध्ये रोहित पवार यांना जे खटकलं तोच प्रश्न पिंकी माळी यांच्या वडिलांच्याही मनात; म्हणाले, …तर जीव वाचला असता

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा देखील समावेश आहे. आता त्यांच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

विमान अपघातामध्ये रोहित पवार यांना जे खटकलं तोच प्रश्न पिंकी माळी यांच्या वडिलांच्याही मनात; म्हणाले, ...तर जीव वाचला असता
Shivkumar MaliImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 7:06 PM
Share

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये विमानाची फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा देखील समावेश होता. दरम्यान या विमान अपघातप्रकरणात अजूनही एफआयआर दाखल करण्यात आलेली नाहीये, यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. आता या सर्व पार्श्वभूमीवर पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. अपघाताची शाहानिशा व्हायला पाहिजे, रोहित पवार यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे,  याची सत्यता बाहेर यायला पाहिजे. मला सीबीआयकडून कोणतीही माहिती मिळाली नाही,  केवळ ज्या बातम्या येतात त्यातून माहिती मिळते, असं यावेळी पिंकी माळी यांच्या वडिलांनी म्हटलं आहे.

दरम्यान विमान बदलण्यात आल्याचा आरोप देखील होत आहे, यावर देखील पिंकी माळी यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.  माझी मुलगी जेव्हा ड्युटीवर असायची त्यापूर्वी ती माझ्यासोबत चर्चा करायची.  यावेळी एकतर पायलट बदली झाला,  सकाळी साडेसहा वाजता कुठलं ट्रॅफिक असतं?  पायलट बदली झाला, विमान बदली झालं, कॅरियरमध्ये पाठीमागे इंधन ठेवलं होतं , अशी माहिती मिळाली. हे काय लगेच आहे का? इंधन कसं काय कोणी घेऊन जाऊ शकतं? सुरतला गेलेली फ्लाईट आली होती तर इंधन पूर्ण भरलेलं होतं. एका मिनिटांत पंधरा किलोमीटरची यांची रेंज आहे. ते विमान अजित पवार यांना बारामतीला सोडून संसदाबादला जाणार होतं. कदाचित इंधन जास्त असल्यामुळे मोठी आग लागली.  जर इंधन कमी असतं तर अनेक लोकांचा जीव वाचला असता, असं शिवकुमार माळी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात आहे की घातपात यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली.  याची सीआयडी चौकशी सुरू आहे,  रिपोर्ट समोर आल्यानंतर नक्की काय ते समजेल.  जे कायद्यामध्ये आहे, त्या पद्धतीने कारवाई झाली पाहिजे. जर कोणी गुन्ह्यात सापडत असेल तर त्यातील कोणालाही सोडलं नाही पाहिजे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report