AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपाविरोधात थेट मोठी खेळी, अखेर मुंबईच्या…

राज्यातील महापालिका निवडणुका झाल्या असून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, आता मुंबईच्या महापाैरपदावरून घडामोडी सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी थेट मुंबई महापालिकेच्या महापाैरपदासाठी दावा केला.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपाविरोधात थेट मोठी खेळी, अखेर मुंबईच्या...
Eknath Shinde
| Updated on: Jan 18, 2026 | 9:02 AM
Share

राज्यातील 29 महापालिकांचा निवडणुका झाल्या आहेत. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून अनेक महापालिकांवर एकहाती सत्ता मिळाली. पूर्ण राज्याच्या नजरा मुंबई महापालिकेच्या निकालाकडे होत्या. पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याकरिता अनेकांनी दावा केला. मतदारांनी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला पसंती दिली असून युतीच्या हातात मुंबई महापालिका गेली. महापाैर भाजपाचाच होणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना शिंदे गटही महापाैरपदासाठी दावा करत असल्याने समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. भाजपकडे शिवसेनेकडून अडीच अडीच वर्षासाठी मनपा महापौर पदाची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सर्व नगरसेवक ताज लॅंड्स एंडमध्ये मुक्कामी आहेत. पुढील तीन दिवस नगरसेवकांचा मुक्काम तिथेच असणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेकडून महापौर पदावर दावा केला जात असल्याने भाजपाकडून आपले नगरसेवक फोडले जाऊ नये, याकरिता शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले. भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पदे सोडावीत अशी शिवसेनेची भावना आहे. ताज लॅंड्स इथे शिवसेनेच्या सर्व 29 नगरसेवकांची कार्यशाळा असेल. सकाळी 10.30 ते 5 वाजेपर्यंत शिवसेनेचे अनुभवी नेते या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

नगरसेवकांनी हाऊसमध्ये कशी कामे करायची, कोणते मुद्दे मांडायचे, शिवसेनेची महायुतीत भूमिका काय असणार यावर मार्गदर्शन केले जाईल. भाजपाचे म्हणणे आहे की, 5 वर्ष आमचाच महापाैर असेल. पण याला शिवसेनेचा विरोध आहे. अडीच अडीच वर्ष महापाैर पद भाजपा आणि शिवसेनेकडे असावे, असे त्यांचे म्हणणे आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या 29 नगरसेवकांनी भाजपाची साथ देऊ नये, याकरिता शिवसेना अलर्ट मोडवर आहे.

पहिल्यांदाच भाजपाचा महापाैर मुंबई महापालिकेवर बसणार आहे. मात्र, त्यापूर्वी मोठा टिवस्ट येताना दिसत आहे. आता भाजपाकडून एकनाथ शिंदे यांची मागणी मान्य केली जाते का? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. मुंबई महापालिकेत भाजपाचे 89 नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले असून मोठा विजय झाला. मात्र, महापाैरपदावर आता दोन्ही पक्षांमध्ये तणाव बघायला मिळत आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...